Bhaskar Jadhav On BJP : भास्कर जाधवांचे 'ते' शब्द भाजपच्या जिव्हारी लागणार ?

Monsoon Session And Bhaskar Jadhav : ठाकरे गटाची आक्रमक बाजू मांडणाऱ्या जाधवांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवले
Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या भाषणाची खूपदा चर्चा होते. ते कुणाचीही तमा न बाळगता स्पष्टपणे बोलतात. यामुळे अनेकदा कुणी ना कुणी दुखावण्याची शक्यताही असेत. मात्र ते आपल्या सडेतोड भाषण आणि शब्दांसाठी ओळखले जातात. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी जाधवांनी भाजपवर जिव्हारी लागेल अशी टीका केली आहे. यामुळे भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Political News)

Bhaskar Jadhav
Nitesh Rane On Love Jihad : धर्मांतरविरोधी कायद्याबाबत नितेश राणेंची मोठी माहिती; म्हणाले, "कुठल्याही क्षणी..."

केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून चौकशीचा ससेमिरा लावून अनेक विरोधातील नेत्यांना भाजप पक्षात घेते किंवा आपल्या बाजून वळवून घेण्याच्या प्रयत्न करते. शिवसेनेनंतर वर्षातच राष्ट्रवादी काँग्रेस फुटीलाही भ्रष्टाचाराचे आरोपच असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांनी आपल्या अधिवेशनातील भाषणात भाजपच्या कुटनितीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

भाजपमध्ये सरकार चालवण्याची क्षमता नसल्याची जहरी टीका भास्कर जाधवांनी केली. ते म्हणाले, भाजप ५०-६० वर्षांची परंपरा सांगते. पण या वर्षांत भाजपला राज्य चालवण्याची क्षमता असलेले नेते तयार करता आलेले नाहीत. सरकार चालवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या पक्षातून तयार झालेले नेते आयात करावे लागतात", असा टोला जाधवांनी भाजपाला लगावला आहे.

Bhaskar Jadhav
Amit Shah In Pune : पंतप्रधान मोदींनंतर पाच दिवसांत केंद्रीय गृहमंत्री शहा पुण्यात; भाजपला लागले निवडणुकीचे वेध

भाजपची विचारधारा बेगडी असल्याचे सांगताना जाधव म्हणाले, "ईडी, सीबीआय, आयकर विभाग, एनआयईला घाबरून विरोधकांतील किती नेते आले भाजपमध्ये ते जाहीर करावे. तुमची विचारधारा, 'आयडियालॉजी' नेमकी काय, ते एकदा राज्याला कळू द्या. मात्र ते तुम्ही सांगू शकत नाही, कारण यावर तुमच्याकडे सांगण्यासारखे ठोस असे काहीच नाही", अशी टीका जाधवांनी भाजपवर केली.

शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे गटाची भूमिका अतिशय आक्रमक आणि मुद्देसूदपणे भास्कर जाधव मांडताना दिसत आहेत. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनीही जाधवांचा समोरासमोर समाचार घेऊ, असा इशारा अधिवेशनातच दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com