Teachers Constituency 2024 : आमदार दराडे स्वत:च्याच नावाला एवढे का धास्तावले?

Nashik Constituency : अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांच्या नावाची आमदार दराडे यांनी घेतली प्रचंड धास्ती
Teachers constituency 2024
Teachers constituency 2024Sarkarnama

Kishore Darade News: शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून काल प्रचंड गदारोळ आणि तणाव होता. त्याला कारण ठरली आमदार किशोर दराडे यांच्या मनातील एक भीती. ही भीती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नाशिक मतदारसंघातून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी आमदार दराडे ठाकरे गटाच्या पाठिंब्याने निवडून आले होते.

काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार किशोर दराडे (Kishor Darade) हे आपल्या समर्थकांसह आले होते. यावेळी कोपरगावचे किशोर प्रभाकर दराडे यांनी राष्ट्रीय जनक्रांती पक्ष तसेच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. नाम साधर्म्यामुळे आमदार दराडे यांनी त्याचा प्रचंड धसका घेतल्याचे चित्र दिसून आले.

यावेळी दराडे आणि त्यांच्या समर्थकांनी नाम साधर्म्य असलेल्या किशोर दराडे या उमेदवाराला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करीत प्रचंड दहशत निर्माण केल्याचे दिसून आले.

या सर्व घडामोडींमुळे त्यात पोलिसांना (Police) हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही बाजूंचे समर्थक मोठ्या संख्येने नाशिक रोड पोलिस ठाण्यात जमले होते. हे प्रकरण अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले. शेवटी किशोर प्रभाकर दराडे यांना पोलिस बंदोबस्तात घरी पोहोचविण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली. मात्र अद्याप तो उमेदवार घरी पोहोचलेला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय प्रचंड दहशतीत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्याशी गाठ पडली. तेव्हा देखील आमदार दराडे यांच्या समर्थकांनी प्रचंड गदारोळ करीत घोषणा दिल्या. वस्तुत: सध्याची निवडणूक ही शिक्षित आणि अभ्यासू मतदार असलेल्या शिक्षकांचे आहे मतदान करताना शिक्षक निश्चितच विचारपूर्वक मतदान करतील नाम साधर्म्यामुळे मतदान करताना शिक्षकांचा गोंधळ होईल ही शक्यता कमीच आहे.

Teachers constituency 2024
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात 'लय जोरात'; थोरातांसाठी नगर काँग्रेस पक्षश्रेष्ठींना घालणार मोठी गळ

या निवडणुकीत 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांच्याशी नाम साधर्म्य असलेले संदीप भीमाशंकर गुळवे आणि संदीप नामदेव गुळवे आहेत. प्रमुख उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी नाम साधर्म्य असलेले सागर कोल्हे आणि संदीप कोल्हे उमेदवार आहेत. यातील काही उमेदवार दराडे यांच्या प्रोत्साहनातून पुढे आले आहेत. मात्र श्री गुळवे आणि कोल्हे या दोघांनीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आमदार दराडे यांनी आपल्याशी नाम साधर्म्य असलेल्या किशोर दराडे यांची एवढी धास्ती का घेतली हा चर्चेचा विषय आहे. आमदार किशोर दराडे यांनी गेल्या सहा वर्षात केलेले काम मतदानासाठी पुरेसे नाही का? की अन्य काही कारणामुळे आमदार दराडे यांनी 'त्या' किशोर दराडे यांचा प्रचंड धसका घेतला असावा. शुक्रवारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार शिक्षकांमध्ये नक्कीच नकारात्मक संदेश देणारा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com