Devendra Fadnavis Nashik Tour : मुख्यमंत्री फडणवीसांच्या नाशिक दौऱ्याआधी ठाकरे गट आक्रमक , दिला 'हा' इशारा

Shivsena Thackeray group News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळाच्या तयारीबाबतचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत.
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray
Devendra Fadnavis On Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

गणेश सोनवणे -

Nashik Political News : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (२३ मार्च)विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्र्यानी सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक बोलविली आहे.

राज्याचे सूत्रे हाती घेतल्यावर मुख्यमंत्री फडणवीस हे पहिल्यांदाच नाशिकमध्ये सिंहस्थ तयारीचा आढावा घेणार आहेत. मात्र, यादरम्यान फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. फडणवीस यांना नाशिकमध्ये पाय ठेऊ देणार नाही, असे ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray
Harshvardhan Sapkal : 'जिधर बम उधर हम', म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा धंगेकरावर 'बॉम्ब'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली होणारी सिंहस्थ आढावा बैठक होऊ देणार नाही, आम्ही त्यांचा निषेध करु, त्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी दिला आहे. त्यामुळे फडणवीस यांचा नाशिक दौरा आता वादात सापडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे दौऱ्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

शिवसेना(Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेऊनही नाशिकचा विकास न झाल्याची तक्रार करत खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अवघ्या दीड वर्षांवर कुंभमेळा येऊन ठेपला आहे. तरीही कुठलेही निधीचे नियोजन अद्याप नाही. मुळात जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही तर अंमलबजावणी कशी होणार आहे. अधिवेशनात आपण पाहत आहोत कुठल्याही प्रकारचा राजशिष्टाचार पाळला जात नाही. जनतेने दिलेल्या बहुमताचा आदर होताना दिसत नाही. त्यामुळे या दौऱ्याला विरोध करत असल्याचे सूर्यवंशी म्हणाले.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray
Manikrao Kokate : धक्कादायक ! कृषिमंत्र्याच्या जिल्ह्यातच मोठा युरिया घोटाळा!

याचबरोबर सूर्यवंशी यांनी सांगितले की, तीन वर्ष झाली नाशिक महापालिकेमध्ये कुठलीही जनरल बॉडी नाही, नगरसेवक नाहीत. महापालिकेचा मागील तीन वर्षांचा कारभार पाहिला तर सत्ताधारी पक्षाचा कुठलाही वचक दिसून येत नाही. 2014मध्ये फडणवीस यांनी नाशिक(Nashik) शहर दत्तक घेतलं होतं, आज अकरा वर्ष त्याला उलटली पण नाशिकचा विकास नाही. हिंदूंच्या जिव्हाळ्याचा विषय असतानाही कुंभमेळ्याचे कुठलेही नियोजन नाही. त्यामुळे सिंहस्थ बैठक होऊ देणार नसल्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com