Jalgaon Political News: जिल्हा दूध संघाचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. फक्त यावेळी खेळाडू बदलले आहेत. उद्या होणाऱ्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी संचालक मंडळावर थेट भ्रष्टाचाराचाच आरोप केला.
जळगाव जिल्हा दूध संघावर सध्या पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि भाजपचे गिरीश महाजन यांचे वर्चस्व आहे. दूध संघाच्या कारभारावरून यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सातत्याने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली जात होती. गतवर्षी सत्ता बदल झाला.
सत्ता बदलानंतर हे टोकाचे राजकारण थांबलेले नाही. फक्त यावेळी गिरीश महाजन यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) मैदानात उतरले आहे. त्यांना संघाच्या संचालकांनीही साथ दिली आहे.
त्यामुळे उद्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर थेट पालकमंत्री पाटील यांनाच घेण्यात आले आहे. दूध संघाकडून सभासदांवर अन्याय होत आहे. या संस्थेत गैरव्यवहार होत असल्याने शेतकऱ्यांची देणे थकली आहेत, असा आरोप विरोधकांनी केला.
त्यामुळे दूध उत्पादक सभासद आणि संस्था अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे यावरून उद्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत.
दूध संघामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या वर्षभराच्या कामकाजात मोठा गोंधळ आहे. पालकमंत्री पाटील यांनी हा भ्रष्टाचार झाला आहे, हे मान्य करावे. किंवा पदाचा राजीनामा द्यावा. याप्रकरणी संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी थेट मागणी माजी खासदार पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात माजी खासदार पाटील यांनी थेट पालकमंत्री पाटील यांना आव्हान दिले आहे. गतवर्षी दुधाचे दर वाढवावे यासाठी आंदोलन झाले. शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. त्यावर राज्य शासनाने पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.
मात्र गेल्या वर्षभरात हे अनुदान मिळालेले नाही. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांचे अनुदान आणि अन्य देणे थकली आहेत. अनेक वर्षांपासून अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आठ ते दहा कोटी रुपये अडकले आहेत.
हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा वर्ग करणार? असा प्रश्न त्यांनी केला. या दूध संघात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. त्यात आपण सहभागी आहोत, असे पालकमंत्र्यांनी मान्य करावे. अथवा पदाचा राजीनामा द्यावा.
हाच यावर पर्याय आहे, असा दावा पाटील यांनी केला आहे. यावेळी दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर विष्णू भंगाळे, सुनील महाजन आदी महायविकास आघाडीच्या नेत्यांनी माजी खासदार पाटील यांना साथ दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.