Eknath Khadse : खडसेंची तिरकी चाल, गिरीश महाजनांना चेकमेट करणार का?

Eknath Khadse vs Girish Mahajan : भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशात काही स्थानिक नेत्यांचा अडथळा आहे. याबाबतचा निर्णय न झाल्यास आपण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होऊ, असे स्पष्ट केले आहे.
Eknath Khadse | Girish Mahajan
Eknath Khadse | Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Khadse Vs Mahajan: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षाचा प्रवेश रखडला. यानिमित्ताने भाजपचा एक मोठा गट खडसे यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचा हा गट खडसे यांना पडद्यामागून मदत करणार का याची उत्सुकता आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादीतच आहोत. माझ्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशात काही स्थानिक नेत्यांचा अडथळा आहे. याबाबतचा निर्णय न झाल्यास आपण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होऊ, असे स्पष्ट केले आहे.

खडसे यांच्या या विधानाचे अनेक अर्थ निघतात. भारतीय जनता पक्षातील केंद्रात सक्रिय असलेल्या एक मोठा गट खडसे (Eknath Khadse) यांच्या विषयी सहानुभूती ठेवणारा आहे. हाच गट अप्रत्यक्षरीत्या राज्यात सक्रिय असलेल्या भाजपच्या काही नेत्यांना रोखण्यासाठी काम करू शकतो.

यातील सगळ्यात पहिला मोहरा जळगावचे नेते आणि खडसे यांचे कट्टर विरोधक राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ठरू शकतात. याबाबत जळगावच्या स्थानिक राजकारणात यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

खडसे यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या भोवती फासे टाकण्यासाठी गेले काही दिवस सातत्याने प्रयत्न केले आहे. यामध्ये त्यांना मोठे यश देखील आले आहे. मंत्री महाजन यांचे निकटचे सहकारी आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत.

यानिमित्ताने खोडपे यांना गिरीश महाजनांचे अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विरोधक मदत करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे गेले सहा टर्म जामनेर मतदारसंघावर एकतर्फी वर्चस्व असलेल्या मंत्री महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Eknath Khadse | Girish Mahajan
Eknath Khadse News : खरं सांगा... नाथाभाऊ, तुमच्या मनातला नेमका पक्ष कोणता; भाजप की राष्ट्रवादी?

भारतीय जनता पक्षातील एका गटाला आणि अगदी जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांना देखील महाजन यांचे वर्चस्व कितपत मान्य असेल, याबाबत विविध मतप्रवाह आहेत. महाजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत.

त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जळगावमध्ये महाजन यांच्या पुढे जाता येत नाही. यातून अनेक जण दुखावले आहेत. या दुखावलेल्या नेत्यांना एकत्र करण्याचे काम खोडपे यांच्या माध्यमातून एकनाथ खडसे करतील. ते काम यापूर्वीच सुरूही झाले आहे. स्थानिक राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांना त्याची जाणीव देखील आहे.

खडसे यांनी काल आपण अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत, असे म्हटले आहे. त्यांनी अचानक हे विधान केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विधानाला विशेष महत्त्व आहे. खडसे यांनी ही भूमिका घेत एक तिरकी चाल खेळली आहे.

मंत्री महाजन यांनी सत्तेच्या माध्यमातून विविध चौकश्या आणि विविध खटल्यांचा ससेमिरा खडसे यांच्या मागे लावला होता. तो अद्यापही कायम आहे. त्यामुळे एकनाथ खडसे मंत्री महाजन यांना जामनेरमध्येच जाळ्यात अडकवण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावण्याची शक्यता आहे.

Eknath Khadse | Girish Mahajan
Eknath Khadse News : एकनाथ खडसे 'या' कारणामुळे जाणार नाहीत जळगावमधील पीएम मोदींच्या कार्यक्रमास

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे या सर्व राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षातील अनेक नेते यंदा निवडणुकीची तयारी करीत आहेत. भारतीय जनता पक्षात मात्र अनेक प्रस्थापित आमदार अनेक निवडणुकींपासून सत्तेत आहेत.

त्यामुळे नव्या नेतृत्वाला संधी मिळत नाही. ही संधी मिळवण्यासाठीचा कोंडमारा यंदाच्या निवडणुकीत काय वळण घेतो याची उत्सुकता आहे. जळगावच्या राजकीय प्रेशर कुकरची ही शिट्टी लवकरच वाजणार हे मात्र नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com