कथित ऑडियो क्लिप प्रकरण; गिरीश महाजन संतापले

Girish Mahajan Audio Clip | फोनवर संभाषण होत असताना महाजन यांनी अत्यंत अर्वाच्य आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. यामुळे आता महाजन यांच्यावर टीका होत आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan Audio Clip | धुळे : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची एक कथित ऑडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. जिल्हा परिषद भरतीबाबत महाजन यांचे एका विद्यार्थ्यासोबत झालेल्या संभाषणाची ही एक ऑडीओ क्लिप आहे. जिल्हा परिषदेच्या भरतीसंदर्भात हा विद्यार्थी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना जिल्हा परिषदेची परीक्षा कधी होणार असल्याचे विचारतो, मात्र महाजन यांच्याकडून त्याला उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

महाजन यांना फोन लावून विद्यार्थ्याने म्हंटले की, "साहेब झेडपीची फाईल तुमच्याकडे आहे. तेवढं बघा ना सर. मुलं खूप डिप्रेशन आहेत."यावर महाजन म्हणाले, तुम्हाला कामं नाहीत का रे काही. दिवसभरातून ५०० फोन करता. मी काही ते करत नाही. रद्द केली मी ते. "यानंतर विद्यार्थ्याने म्हंटले की, "अहो साहेब मुलं डिप्रेशनमध्ये आहे." तर यावरही महाजन म्हणाले की, रद्द केले ते, ठेव फोन. फोनवर संभाषण होत असताना महाजन यांनी अत्यंत अर्वाच्य आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. यामुळे आता महाजन यांच्यावर टीका होत आहे. यावर महाजन यांची प्रतिक्रीया अजूनही आलेली नाही. मात्र त्यांच्यावर विविध स्तरातून रोष व्यक्त होत आहे.

Girish Mahajan
Kedar : लोकशाहीचे चारही स्तंभ अधिकाराचा वापर करताना कर्तव्यांचे पालन करतात का?

याबाबत त्यांना विचारणा केलि असता त्यांनी या ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण दिले आहे. '' शिक्षक भरतीसंदर्भात मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातयं. जिल्हा परिषदेच्या भरतीसंदर्भात कालपासून जवळपास ४०० ते ५०० फोन कॉल्स आले. जाणीवपूर्वक कॉल करुन मला त्रास दिला जातोय. पण हा विषय माझा नसून हे सर्व काम शिक्षण विभागाचे आहे. दीपक केसरकर शिक्षण विभागाचे मंत्री आहेत. शिक्षक भरती संदर्भात कॅबिनेटमध्येही चर्चा झाली आहे. राज्य सरकार लवकरच शिक्षक भरतीची घोषणा करेल असं गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये 'काम नाही का रे तुम्हाला काही सणासुदीच्या दिवसांत; दिवसभरातून ५०० फोन लावता. काही करत नाही मी, रद्द झाली ती परीक्षा. रद्द केली, फोन ठेव', अशा शब्दांत गिरीश महाजन जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या आरोग्य पदभरतीबाबब माहिती विचारणाऱ्या उमेदवाराला उत्तरे दिल्याची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र अद्याप या क्लीपच्या सत्यतेबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com