Nagar Bazar Samiti: नगर बाजार समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब बोठे तर उपसभापतीपदी रभाजी सूळ

Ahmednagar News: नगर बाजार समितीच्या सभापतीपदी, उपसभापतीपदाची निवड बिनविरोध पार पडली.
Nagar Bazar Samiti
Nagar Bazar SamitiSarkarnama

Ahmadnagar Politics : अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब बोठे आणि उपसभापतीपदी रभाजी सूळ यांची निवड झाली आहे. आज नगर बाजार समितीच्या सभापतीपदी, उपसभापतीपदाची निवड बिनविरोध पार पडली. या दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.

नगर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि भानुदास कोतकर यांच्या गटाने 18 जागांवर विजय मिळवला होता. सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता.

Nagar Bazar Samiti
D.K.Shivkumar News: डी.के.शिवकुमार भाजप नेत्याच्या पडले पाया; व्हिडिओ व्हायरल...

त्यानंतर आज (दि.22 मे) नगर बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवड बिनविरोध झाली. यामध्ये सभापतीपदी भाऊसाहेब बोठे आणि उपसभापतीपदी रभाजी सूळ यांची निवड करण्यात आली.

Nagar Bazar Samiti
Jayant Patil ED Enquiry News : ईडी चौकशीला सामोरे जाताना जयंत पाटलांना अनुभवी लोकांनी दिला 'हा' सल्ला...

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी सभापतीपदासाठी फिंडींग लावल्याची चर्चा होती. पण अखेर सभापती आणि उपसभापती पदावर भाऊसाहेब बोठे आणि रभाजी सूळ यांची वर्णी लागली. या निवडीनंतर भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी त्यांचा सत्कार केला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com