Jamkhed News : महिला सरपंचाचे पती होतायत ग्रामपंचायतीचे 'अधिपती'..

Mohari Grampanchayt : उपसरपंच बसणार उपोषणाला ; तक्रार करुनही अधिकाऱ्यांचा कानाडोळा.
Villagers while giving a statement
Villagers while giving a statementSarkarnama
Published on
Updated on

Jamkhed News : जामखेड तालुक्यातील मोहरी गावच्या ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांचे पतीच गावच्या कारभारात 'अधिपती' होऊ लागले आहेत. यातून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत लेखी तक्रार करुनही मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी कानाडोळा केल्याने आता ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांनीच उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

गावच्या महिला सरपंच सुवर्णा हजारे यांचे पती हनुमंत हजारे यांचा ग्रामपंचायतीच्या कारभारात कमालीचा हस्तक्षेप वाढला आहे. यातून त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे उपसरपंच हनुमान बारगजे यांच्या लक्षात आले. या विरोधात जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जामखेड Jamkhed पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

Villagers while giving a statement
Pankaja Munde : ऐन डिसेंबरमध्ये उकाडा का वाढला; पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण..

मात्र याबाबत दोन्ही अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने बारगजे यांनी अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज नावाला असून मुख्य कारभार पदाधिकाऱ्यांचे पती, नातेवाईक चालवत असल्याचे चित्र आहे. यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वचक असणे आवश्यक आहे.

यातून अनेकदा तक्रारींचा सूर ठिकाणी होताना आढळून आलेला आहे. मोहरी गावातील ग्रामपंचायतीत देखील हिच परिस्थिती सुरु आहे. याबाबत बारगजे यांनी 26 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांना तर 31 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुराव्यानिशी तक्रार अर्ज सादर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर आतापर्यंत कुठल्याही प्रशासकीय पातळीवर कुठलीही दखल घेतलेली नाही. सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरु आहे. विकास कामे चुकीच्या प‌द्धतीने करत आहेत, याची दखल घेतली जात नसल्याने दि. 20 डिसेंबर पासून उपोषण करणार असल्यासाचा इशारा उपसरपंचांनी दिला आहे.

Edited By : Amol Sutar

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com