आठ महिन्यांपूर्वीच ठरला होता बंडखोरीचा प्लॅन; शिवसेना नेत्याचा खळबळजनक खुलासा

Jalgaon Politics| Shivsena| Eknath Shinde news| शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे आणि जे पळून गेले ते ते गद्दार आहेत, हे शिवसैनिकांना कळलं आहे.
Jalgaon Politics| Shivsena|
Jalgaon Politics| Shivsena|
Published on
Updated on

जळगाव : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde ) यांनी बंड पुकारल्यापासून महाविकास आघाडीचे सरकार पणाला लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचा (Shivsena) विश्वासू नेता अशी ओळख आहे. त्यांनीच पक्षातील आमदार फोडल्याने राज्यभरात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

पण राज्यात गेल्या आठ महिन्यापासून फोडाफोडीचा हा प्लॅन शिजत होता आणि त्याची कल्पना आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी कल्पना दिली होती, असा खुलासा जळगावमधील शिवसेनेच्या शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला आहे. जळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदते ते बोलत होते.

Jalgaon Politics| Shivsena|
बंडूकाका बच्छाव बंडखोर दादा भुसेंचे राजकारण विस्कटवणार?

संजय सावंत म्हणाले, 'गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेमध्ये बंड पुकारले जाणार आहे, याची कल्पना 8 महिन्यांपूर्वीच दिली होती. एवढंच नाहीतर एक मोठा मंत्री हे फोडाफोडी करणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं होतं. शिवसेना पक्ष कोणालाही घाबरत नाही. शिवसेना इडीला, कोणाच्या धमकीला कशालाच घाबरत नाही.''

''शिवसेनेने गुलाबराव पाटलांना आजपर्यंत मोठं केलं, पण त्यांनीच गद्दारी केली. मंत्रिपदासाठी बंडखोर झाले. गद्दार एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले.पण आता या गुलाबराव पाटील यांना शिवसेना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,'' असा इशाराही संजय सावंत यांनी दिला.

Jalgaon Politics| Shivsena|
चर्चा केली अनामिकाशी ....नाव सांगतिले कृषीमंत्री दादा भुसेंचे !

राज्यात सुरु असलेल्या घडामोडींमुळे इतके दिवस शिवसैनिकांना जे चाललंय ते खरं की खोटं? हे समजत नव्हतं. आपण कोणाची बाजू घ्यायची हे समजत नव्हते. पण आता शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे आणि जे पळून गेले ते ते गद्दार आहेत, हे शिवसैनिकांना कळलं आहे. या गद्दारांच्या विरोधात आतासंपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पेटून उठणार आहे, असंही सावंत यांनी सांगितलं.

वसेना आमदार खासदार यांचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर आमदार खासदार निवडून येतात. शिवसैनिक एकत्र असताना शिवसेनेला काहीही चिंता करायची गरज नाही,आता त्यांना त्यांच्या मतदारसंघात आम्ही जिंकू देणार नाही, असही सावंत यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com