Rohit Pawar Statement: ''...तर जामखेड बाजार समितीत आमचा सभापती झाला असता!''; रोहित पवारांचं मोठं विधान

Jamkhed Market Committee Election : ...पण शेवटी लोकं जो निर्णय देतात. तो आपल्याला स्वीकारावा लागतो आणि पुढे जावं लागतं.
Rohit Pawar News
Rohit Pawar NewsSarkarnama

Jamkhed APMC Election News: जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरली. कर्जत जामखेड मतदारसंघातील दोन्ही बाजार समित्यांच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांना 9-9 जागा मिळाल्या. यानंतर जामखेडमध्ये ईश्वर चिठ्ठी काढून सभापतीपदाची माळ भाजपचे शरद कार्ले यांच्या गळ्यात पडली तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास वराट यांची वर्णी लागली.

यानंतर भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

Rohit Pawar News
Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रकृती बिघडली? ; काय आहे सत्य?

आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीसह विखे शिंदे आरोप प्रत्यारोपावरही भाष्य केलं. पवार म्हणाले, काल जामखेड बाजार समितीची होती चिठ्ठी निघाल्यानंतर तिथे जो सभापती आहे तो भाजपचा झाला, जे तिथे असणारे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी विखेंबाबत जे वक्तव्य केलं तो त्यांच्या पार्टीचा अंतर्गत विषय आहे.

विखेंचं वलय जिल्ह्यामध्ये नक्की...

रोहित पवार म्हणाले, जामखेड बाजार समितीत(Jamkhed Bazar Samiti Election) जर आम्ही अर्थकारण, पैशाचा वापर केला असता तर तिथे आमचा सभापती होऊ शकला असता. पण शेवटी लोकं जो निर्णय देतात. तो आपल्याला स्वीकारावा लागतो आणि पुढे जावं लागतं. त्यामुळे विखे आणि शिंदे काय बोलतात. आतल्या आत काय करतात, तो त्यांचा त्यांचा विषय आहे. पण विखेंचं वलय त्या जिल्ह्यामध्ये नक्की आहे हे एक नक्की आहे.

अशा परिस्थितीत मला त्यांची कुठेही मदत झालेली नाही आणि मदत झाली नसेल तर मग रडीचा डाव भाजपच्या तिथल्या स्थानिक नेत्याकडून का केला जातोय याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Rohit Pawar News
Radhakrishna Vikhe Patil News : राम शिंदेंच्या आरोपांवर विखे-पाटील स्पष्टच बोलले; पक्षनेतृत्वाकडे आम्हीही आमची भूमिका मांडू...

कोणत्याही पक्षाचा एक अनुभवी नेता असेल आणि ते जर मंत्री असतील आणि उगाचच जर आरोप होत असतील तर यावर त्या त्या लोकांनी त्यांच्या पातळीवर उत्तर द्यायला हवं असंही पवार म्हणाले. मला या निवडणुकीत विखेंची कुठेही मदत झालेली नसल्याचंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

शिंदेंचा विखेंवर आरोप काय?

"रोहित पवार आणि सुजय विखे पाटील(Sujay Vikhe Patil) यांच्या एकत्रित पॅनलेच उमेदवार उभे होते. आम्ही दीड महिना कुठेही भाष्य केलं नाही. शेवटच्या क्षणी का होईना आम्ही सत्तेत आहोत. आमचे खासदार आहेत, मंत्री आहेत, आमची देशात आणि राज्यात सत्ता आहे. अनेक लोक सांगतात की, विखे ज्या पक्षात जातात, त्याच पक्षाविरोधात काम करतात. त्याचा प्रत्यय मला आला असं आमदार राम शिंदे म्हणाले होते.

Rohit Pawar News
Ganesh Sugar Factory Election: गणेश कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; विखे पाटलांच्या विरोधात थोरात - अजितदादा उतरणार?

'हे' आहे वादाचं कारण ?

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप खासदार सुजय विखे यांचे स्वीय सहायक आणि कार्यकर्ते कैलास वराट, अंकुश ढवळे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली. सभापतीपदाच्या निवडणुकीत हे उमेदवार फुटतील असं वाटलं होतं. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

परिणामी, ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून सभापती आणि उपसभापतीपदाबाबत निकाल लागला. ईश्वर चिठ्ठी जरी निघाली तरी ती आमच्याच बाजूने निघेल असा दावा भाजप आमदार राम शिंदे यांनी केला होता आणि तसंच झालं. मात्र जरी सभापतीपद भाजपकडे आलं असलं तरी सुजय विखेंचे समर्थक हे राष्ट्रवादी सोबतच राहिले. यामुळे भाजपमधील दोन दिग्गज नेत्यांमध्ये संघर्ष उफाळून आला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com