Vivek Kolhe : 'टीडीएफ' संभ्रमात, आणखी एक गट फुटला; विवेक कोल्हेंच्या संपर्कात गेला!

To Vivek Kolhe Supported by TDF : नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत 'टीडीएफ'ची चार शकलं पडली आहेत. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना 'टीडीएफ'च्या एका गटाने पाठिंबा दिला आहे. या गटाने विवेक कोल्हे यांच्या विजयाचा निर्धार केला आहे.
Vivek Kolhe
Vivek Kolhesarkarnama
Published on
Updated on

Vivek Kolhe News : नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) शकलं झाली असून, वेगवेगळ्या भूमिकांमुळे 'टीडीएफ' नेमकी कोणाच्या बाजूने याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

"विवेक कोल्हेंनी उमेदवारी जाहीर केली. यानंतर त्यांच्यावर अनेक संकटे आली. पण विवेक कोल्हे डगमगले नाहीत. शिक्षकांसाठी ते ठामपणे संकटांच्या वादळात उभे आहेत आणि राहितील. यात लढाईत शिक्षकांच्या एकीचे ताकद त्यांना नक्की बळ देईल", असा विश्वास व्यक्त करत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी विरोधकांना सुनावले.

निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या मातुश्री माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची 'टीडीएफ'च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत पाठिंबा दिला. शिर्डीत (Shirdi) 'टीडीएफ'च्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी विद्यापीठाचे व्यवस्थापकीय संचालक अमित कोल्हे, एन. एन. लगड, 'टीडीएफ'चे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव रक्टे, क्रीडा महासंघाचे उपाध्यक्ष संजय कंगले, प्राचार्य प्रमोद तोरणे, चांगदेव कडू, शंकरराव जोर्वेकर, बाबासाहेब गांगुर्डे उपस्थित होते.

Vivek Kolhe
Rajendra Vikhe : राजेंद्र विखेंची पोस्ट चर्चेत; 'शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोखा खा गया...'

भाजपच्या (BJP) माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी विवेक कोल्हे युवा नेतृत्व आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी कमी वयात उत्तम कार्य केले आहे. देशाती 'ईफको' संस्थेत संचालक झालेत.विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून शिक्षक मतदारसंघात कार्यकुशल नेतृत्व मिळणार आहे. हे युवा नेतृत्व शिक्षकांचे प्रश्न तडीस नेल्याशिवाय गप्प बसणार नाही, याची हमी स्नेहलता कोल्हे यांनी दिली. "'टीडीएफ'च्या भूमिकेचे स्वागत आहे. कामाचा उमेदवार पारखून पाठिंबा दिला आहे. हा निर्णय साईबाबांच्या पावन भूमीत टीडीएफने जाहीर केला आहे. यामुळे विवेक कोल्हे शिक्षकांचे प्रामाणिकपणे नेतृत्व करतील", अशी ग्वाही स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

'टीडीएफ'चे एन. एस. लगड म्हणाले, "राज्य संघटनेने जो उमेदवार दिला. तो आमच्या पसंतीचा नाही. त्यामुळे नाशिक विभागातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी होती. मात्र विवेक कोल्हे सुशिक्षित आहेत. त्यांनी त्यांचे राजकीय कौशल्य सिद्ध केले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर ते प्रामाणिक काम करतील आणि रिझल्ट देतील. या लढाईत आम्ही 'टीडीएफ'च्या माध्यमातून त्यांच्या मागे ठामपणे उभे आहोत". विवेक कोल्हे यांनी आता नगर जिल्ह्यात प्रचारात वेळ वाया घालू नये. ती जबाबदारी टीडीएफची असून त्यांनी इतर जिल्ह्यात मोर्चेबांधणी करावी, असेही एन. एस. लगड यांनी सांगून विरोधकांची धास्ती वाढवली.

Vivek Kolhe
Chhagan Bhujbal : किशोर दराडेंच्या बैठकीला भुजबळांची दांडी, विसंवाद की इशारा?

बाळासाहेब गांगुर्डे यांनी सुशिक्षित उमेदवार विवेक कोल्हेच्या माध्यमातून मिळाला. म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेतली. सुसंस्कृत, अभ्यासू, शिक्षणकांची शोभा वाढवणारे नेतृत्व मिळत असल्याने रयत सेवक विकास आघाडी देखील विवेक कोल्हे यांच्याबरोबर उभी आहे, असे सांगितले.

'टीडीएफ'चे चार शकलं

शिक्षक लोकशाही आघाडीचे (टीडीएफ) या निवडणुकीत चार शकलं झाली आहेत. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे यांना 'टीडीएफ'चा उमेदवार असल्याचे म्हटले आहे. ‘टीडीएफ’च्या एका गटाने नगरच्या माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सर्वेसर्वा भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी घोषित केली, तर दुसऱ्या गटाने आप्पासाहेब शिंदे यांना उमेदवारी दिली. आता आणखी एका गटाने विवेक कोल्हे यांना पाठिंबा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com