Shivsena News : एकनाथ शिंदे नव्हे गुजरातची लॉबी चालविते राज्यातील सरकार

There is a big interferance by Gujrat lobby in the State Government-आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर टीका
Aditya Thackeray & CM Eknath Shinde
Aditya Thackeray & CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray On State Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मनाने नव्हे तर इतरांच्या कलाने कारभार करतात. राज्याच्या सरकारच्या कारभारात गुजरात लॉबीचा मोठा हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. (Aditya Thackeray criticized state Government on there policies)

राज्याचे (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोणताही जनहिताचा निर्णय घेऊ शकलेले नाही. ते फक्त विरोधी पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांविरोधात सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करण्यात व्यस्त आहेत, अशी टिका शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली.

Aditya Thackeray & CM Eknath Shinde
Nashik News : अवैध व्यवसायांकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष घातक!

आदित्य ठाकरे नाशिकमध्ये आले होते, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात शेतकरी, जनतेचे प्रश्न आ वासून उभे असताना सरकारमधील मंत्री पालकमंत्रीपदांवरून भांडत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत, शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली परंतु शासन आपल्या दारी जाऊनही मदत मिळत नाही, एवढी वाईट परिस्थिती आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्ष हुकूमशाही पद्धतीने वागत आहे.

श्री. ठाकरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशिनमध्ये धुतले गेलेले गद्दारांचे मुख्यमंत्री डरपोक आहेत. सिनेटच्या निवडणुका देखील ते घेऊ शकत नाही. इतकी त्यांची मानसिकता खालावली आहे.

Aditya Thackeray & CM Eknath Shinde
Dada Bhuse - Aaditya Thackeray Meet: आदित्य ठाकरेंबरोबर गुप्त भेट झाली का ? दादा भुसेंनीच केला मोठा खुलासा

क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मुंबईला व्हायची, ती देखील आता गुजरातमध्ये गेली. यावरून राज्य मिंधे सरकार नव्हे तर गुजरात लॉबी चालवत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com