Nashik BJP News : भाजपची जम्बो कार्यकारीणी, मात्र मोजक्याच निष्ठावंतांना Entry!

There is no place for Loyal leaders of BJP in new executive commitee-भाजपच्या शहर कार्यकारीणीत तब्बल सव्वाशेंची भरती, कार्यक्रमाला मात्र नसते उपस्थिती.
Balasaheb Sanap & MLA Rahul Dhikle.
Balasaheb Sanap & MLA Rahul Dhikle.Sarkarnama
Published on
Updated on

BJP followers unhappy : जगातील सर्वात मोठा पक्ष असा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नियुक्तीसाठी कागदावर देखील जागा मिळत नाही. कार्यक्रम अन् बैठकांसाठी मात्र निम्मे लोकही नसतात. त्यामुळे नव्याने जाहीर केलेल्या सव्वाशे जणांच्या कार्यकारिणीतील अनेक पदाधिकारी पक्षात किती काळ आहेत, असा संभ्रम निर्माण झाला आहे. (BJP appoints more then 125 members executive committee for Nashik city)

नव्याने नियुक्त (Nashik) कार्यकारीणीत (BJP) पुन्हा एकदा मानापमान नाट्य सुरू आहे. त्यात विद्यमान आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikle) आणि माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांच्या समर्थकांत कही खुशी कही गम अशी स्थिती आहे.

Balasaheb Sanap & MLA Rahul Dhikle.
Maratha Aarakshan Live : मनोज जरांगेंचे उपोषण मागे, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुशंगाने भारतीय जनता पक्षाने नाशिक शहराची कार्यकारिणी घोषित केली आहे. यात उपाध्यक्ष, सरचिटणीस यांसह डझनभर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत चक्क 15 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस आणि 15 चिटणीस आहेत. यातील नावांवर नजर टाकल्यास यातील किमान निम्मे लोक आमदारांचे आप्तस्वकीय आणि जवळची मंडळी आहेत. यातील किती लोक प्रत्यक्ष बैठकांना हजर राहतात, आंदोलनात सहभागी होतात, पक्षासाठी वेळ देतात हा चिंतनाचा विषय आहेत. त्यांच्या नियुक्तीचे निकष काय असावेत, याची चर्चा सध्या सुरू आहे.

Balasaheb Sanap & MLA Rahul Dhikle.
Niphad Maratha News : सरणावरील उपोषणकर्त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा!

पक्षाच्या या जम्बो कार्यकारिणीत चक्क सव्वाशे लोक आहेत. त्यात अनेक सेल असे आहेत, त्या सरकारी योजना आहेत, किंवा अन्य राज्ये आहेत. अशा चक्क 38 आघाड्या आहेत. त्यामुळे नवी कार्यकारीणी जाहीर होताच चर्चेचा विषय झाली आहे.

नाशिक रोडला संभाजी मोरुसकर, हेमंत गायकवाड, योगेश भगत, सचिन हांडगे, नवनाथ ढगे, महेंद्र अहिरे, सुनील आडके यांना स्थान नाही. नाशिक रोडला पंचवटी मतदार संघातील किमान ५० टक्के भाग येतो. शहर कार्यकारिणी जाहीर करताना माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थकांना कार्यकारणीत नाशिक रोडचे रहिवासी म्हणून स्थान देण्यात आले आहे. मात्र विद्यमान आमदार राहुल ढिकलेंच्या समर्थकांना नाशिक रोडला स्थान देण्यात आलेले नसल्याची प्रतिक्रिया सध्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com