Chhagan Bhujbal News : जनगणनेसाठी देशव्यापी आंदोलनाची गरज!

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची मुंबईत बैठक संपन्न
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : देशात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, जनगणनेसाठी देशव्यापी आंदोलनाची गरज आहे. जो पर्यंत ओबीसींची आकडेवारी कळणार नाही तो पर्यंत ओबीसी आपल्या हक्कापासून वंचित राहतील यासाठी जनगणना झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी राज्याचे माजी उमुख्यमंत्री व समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज केली. (Mahatma Phule Samata parishad state working meeting held in Mumbai)

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची (Samata Parishad) राज्य कार्यकारीणीची बैठक मुंबईत (Mumbai) पार पडली. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार (Centre Government) देशाच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे अशी टिका केली.

Chhagan Bhujbal
Supreme Court Hearing on ShivSena : घटनापीठासमोरील 9 प्रश्न कोणते; त्यावरच येणार निकाल?

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, सर्वच पक्षात जसे फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचे लोक आहेत तसेच सर्वच पक्षात या विचारांचे विरोधक सुद्धा आहेत. मात्र आपण समता परिषदेच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार जनतेत पसरविणे हे चालूच ठेवले पाहिजे. समता परिषदेचा अजेंडा हा गरिबांचा, मागासवर्गीयांचा आणि दलितांच्या उधारासाठी आहे. त्यामुळे समता परिषद ही मागासवर्गीय, वंचित, दलीत घटकासाठी नेहमी लढत आली आणि इथून पुढे देखील लढत राहील.

यावेळी श्री भुजबळ म्हणाले की, आज राजकीय परिस्थिती बदललेली पाहायला मिळते मात्र अश्या परिस्थिती मध्ये देशात पवार साहेब सोडले तर कोणताच नेता फुले शाहू आंबेडरांच्या वाटेने जाताना आढळत नाही. राजकारणात फक्त डोकी मोजली जातात त्यातला विचार मोजला जात नाही मात्र पवार साहेब आजही आपले विचार सोडत नाही हे सर्वात महत्वाचे आहे. माझ्या राजकीय वाटचालीत देखील मी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आणि तो शेवटपर्यंत देत राहील.

Chhagan Bhujbal
Narhari Zirwal Statement: ''माझ्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर झालेला नाही!''; झिरवळांचं मोठं विधान

समता परिषदेची व्याप्ती आपण वाढवली पाहिजे. प्रत्येक घरात हे फुले शाहू आंबेडकरांचे विचार गेलेच पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने काम करायला हवे. तुम्ही एकसंध राहिलात तर आणि तरच ओबीसी घटकाला फायदा होईल, विखुरलेल्या ओबीसी घटकाच्या वाट्याला काहीच येणार नाही. असे प्रखर मत भुजबळ यांनी व्यक्त केले

या बैठकीला प्रा. हरी नरके, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, कार्याध्यक्ष बापु भुजबळ, उपाध्यक्ष दिलीप खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मुंबई अध्यक्ष सदानंद मंडलिक, प्रा. दिवाकर गमे, ॲड. सुभाष राऊत, बाळासाहेब कर्डक, मकरंद सावे, मंजिरी घाडगे, प्रा. कविताताई म्हेत्रे, प्रा. काविताताई कर्डक, वैष्णवी सातव, अंबादास गारुडकर, प्रा नागेश गवळी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com