माझ्यावर आरोप करणारे स्वतःसाठीच खोदतायत खड्डे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शाब्दिक हल्ला.
Eknath Shinde, Chief Minister
Eknath Shinde, Chief MinisterSarkarnama

नंदुरबार : एक शेतकऱ्याचा (Farmers son) मुलगा मुख्यमंत्री झाला त्याचा पोटशूळ काहींना उठतो. त्यामुळे आरोप करून बदनाम (Infamous) करताहेत. मात्र लक्षात ठेवा मी कामाला प्राधान्य देतो. माझ्यावर आरोप करणारे स्वतःसाठीच खड्डे खोदत आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. (Chief minister Eknath Shinde defence for himself on political criticism)

Eknath Shinde, Chief Minister
अस्वस्थ गुलाबराव म्हणाले, `या रवी राणांना कोणी तरी आवर घाला`

ते म्हणाले, तुम्ही कितीही आरोप करा, मात्र जनता जाणून आहे. तुमचे आरोप जनतेला माहिती आहेत. त्यामुळे तुमच्या आरोपांना जनता भीक घालत नाही. अडीच वर्षांत सरकारने जे निर्णय घेतले नाही ते आम्ही अडीच महिन्यात घेतले. आरोपांना मी कामांच्या माध्यमातून उत्तर देईल.

Eknath Shinde, Chief Minister
तेजोमय दीपावलीत उज्ज्वल भविष्याची बीजे..!

नंदुरबार पालिकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर शिंदे गटाचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याला मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार मंजुळा गावित, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी उपस्थित होते.

मुख्यंमत्री शिंदे म्हणाले, की काहीजण आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र गद्दार आम्ही नव्हे तर गद्दारी तुम्ही केली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. निवडणुकीचा वेळी शिवसेना- भाजप युती म्हणून बाळासाहेब ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून मते मागतिली. निकाल हाती येताच दुसऱ्यांसोबत सत्ता स्थापन केली. याला काय म्हणावे.

या मुळे जनतेचा मनात व आमदारांचा मनात राग खदखदत होता. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. आज जनतेचा मनातले आपले सरकार स्थापन झाले आहे. मी तुमचा आहे. तुमच्या अपेक्षा, तुमच्या विकासासाठी मी झटणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जनतेला आवश्‍यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, जिल्ह्यातील कुपोषणाचे असलेले आव्हान, तोरणमाळ पर्यटन विकासासाठी आवश्‍यक सुविधा व जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे प्रश्‍नांसह विकासकामे मार्गी लावले जातील.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com