Nashik NCP News : छगन भुजबळ यांनी आपला बायोडाटा तपासून पहावा!

Those who criticize our leader Sharad Pawar should speak thoughtfully-शरद पवार यांच्यावर टिका करणाऱ्यांनी विचारपूर्वक बोलावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
NCP office bearers at Trimbakeshwar
NCP office bearers at TrimbakeshwarSarkarnama
Published on
Updated on

Nashik NCP News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आपला बायोडाटा तपासून पहावा. त्यात स्वतःच्या कारकिर्दीत शरद पवार यांचे योगदान किती आहे, हे बघूनच शरद पवार यांच्यावर टीका करावी, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेश कार्याध्यक्ष परुषोत्तम कडलग यांनी दिला आहे. (NCP Sharad Pawar followers warns rebel leader for there comments on Sharad Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टिका करणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) तसेच भाजप (BJP) समर्थक बंडखोर मंत्र्यांना इशारा दिला आहे.

NCP office bearers at Trimbakeshwar
BJP News : नगरसेवकाचा भाजपला घरचा आहेर, ‘ठेकेदारांकडून महापालिकेत सुरू आहे लूट’

त्रंबकेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्याची बैठक महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी युवक शाखेचे जिल्हाध्यक्ष घनशाम हिरे उपस्थित होते. यावेळी श्री. कडलग म्हणाले, त्रंबकेश्वर तालुका हा पक्षाचा बालेकिल्ला आहे. येथील एकही पदाधिकारी अजित पवार गटाबरोबर गेलेला नाही.

ते पुढे म्हणाले, मंत्री भुजबळ हे आपल्या सर्वांचे नेते होते. त्यांच्या माध्यमातून परिसरात विकास कामे झाली. परंतु आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बहुजन समाजाचे मतदान तीनही लोकसभा निवडणुकीत केले, परंतु पवार साहेबांच्या विरोधात भूमिका घेऊन मंत्री भुजबळ यांनी चुकीचा निर्णय घेतला. त्यामुळे त्रंबकेश्वरचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज आहेत.

NCP office bearers at Trimbakeshwar
Dhule Shivsena News: शिवसेनेचा भाजपवर थेट हल्ला, ५ वर्षे झाली पाणी केव्हा देता!

श्री. भुजबळ यांनी आपला बायोडाटा तपासून पहावा. त्यात आपल्या कारकिर्दीत शरद पवार यांचे योगदान किती आहे, हे बघूनच त्यांच्यावर टीका करावी. यापुढे पवार यांच्याविषयी काढलेला अपशब्द खपवून घेतला जाणार नाही.

...तर फिरू देणार नाही

पक्ष सोडून गेलेल्या लोकांनी शरद पवार यांच्याविषयी अपशब्द अथवा टिका टिप्पणी केली तर ते खपवून घेतले जाणार नाही. यापुढे शरद पवार यांच्याबाबत बोलताना प्रत्येकाने आपली पायरी पाहून बोलावे, अन्यथा अशा नेत्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा देण्यात आला.

NCP office bearers at Trimbakeshwar
इंडियाच्या बैठकीवर Rohit Pawar म्हणतात | INDIA ALLIANCE |

यावेळी अरुण मेढे, मनोज कांनव, कैलास मोरे यांनीही बंडखोरांवर टिका केली. यावेळी विजय गांगुर्डे, भास्कर मेढे, स्वप्निल बागडे, मोहन बदादे, धर्मा भस्मे, अमोल येले, साहेबराव देहाडे, अशोक चव्हाण, दिलीप पवार, शांताराम झुले, अरुण बोरसे, योगेश चव्हाण आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com