Lok Sabha Result 2024 : ठाकरे संपले म्हणणारे आता म्हणतात, 'उद्धव ठाकरे आगे बढो'

Uddhav Thackrey Politics : खासदार संजय राऊत यांनी नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार केला
Rajabhau Vaje - Sanjay Raut
Rajabhau Vaje - Sanjay RautSarkarnama

Uddhav Thackrey News : नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी सत्कार केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाडाव शक्य आहे हे स्पष्ट झाल्याचे सांगितले.

खासदार वाजे यांचा संजय राऊत यांनी मुंबईत सत्कार केला. यावेळी त्यांनी वाजे यांना आगामी कालखंडात कामे कशी करावी याबाबतच्या टिप्स दिल्या. आगामी काळात गाफील राहू नका,असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर,महानगर प्रमुख विलास शिंदे यांचा विविध पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रात राजकारणाचा खेळ खंडोबा केला. सत्तेसाठी शिवसेनेत फूट पाडली शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला दिले. एवढेच नव्हे तर, राष्ट्रवादीतही असेच तत्वहीन राजकारण केले. त्यामुळे जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपला चोख उत्तर दिले आहे.

या निवडणुकीत लोकसभेच्या 165 जागांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा अवघ्या दोन हजारांच्या फरकांनी पराभव झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाने आपल्या सत्तेचा फार आनंद साजरा करू नये.

इंडिया घडीला मतदारांनी प्रचंड मतदान केले आहे. महाराष्ट्रात भाजपच्या जागा 23 वरून नऊ झाल्या. पक्ष जाऊनही उद्धव ठाकरे यांच्या जागा अठरा वरून नऊ झाल्या आहेत. इंडिया आघाडीने भाजपला मागे टाकले आहे, असे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले

Rajabhau Vaje - Sanjay Raut
Uddhav Thackeray : विधानसभेला शिवसेना ठाकरे गट भाजपसोबत हातमिळवणी करणार?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व यंत्रणा गैरप्रकार दबाव तंत्र केले आहे. तरीही त्यांना बहुमत मिळालेले नाही. यातून पंतप्रधान मोदी यांचा पाडाव सहज शक्य आहे,असा संदेश गेला आहे.

शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामागे 40 आमदार गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे आता संपले असे म्हटले जात होते. मात्र या परिस्थितीत देखील ठाकरे यांनी या परिस्थितीला सामोरे जात लोकसभेच्या निवडणुकीत आपला करिश्मा दाखविल्याने तेच लोक आता उद्धव ठाकरे आगे बढो म्हणत आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com