Uddhav Thackeray : विधानसभेला शिवसेना ठाकरे गट भाजपसोबत हातमिळवणी करणार?

Will Shivsena Thackeray Faction will shake hand with BJP in Maharashtra Assembly Elections : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पक्षाचे नेते, खासदार, आमदार, विभागप्रमुखांची बैठक पार पडली.
devendra fadnavis | narendra modi | uddhav thackeray
devendra fadnavis | narendra modi | uddhav thackeray sarkarnama

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळालं आहे. शिवसेनेला 9 जागा मिळाल्यानं ठाकरे गटात उर्जा आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा भाजपशी हातमिळवणी करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

पण, आगामी विधानसभेत भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी करणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी यांनी सोमवारी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितलं. तसेच, विधानसभेच्या तयारीला लागण्याचे निर्देशही ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पक्षाचे नेते, खासदार, आमदार, विभागप्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी विजयाबरोबर ज्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवाची कारणे सुद्धा जाणून घेण्यात आली. याशिवाय उद्धव ठाकरेंनी पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या तयारीचा आढावाही घेतला.

लोकसभेत भाजप आणि त्यांच्या मित्रमंडळींना महाविकास आघाडीनं एकत्रितपणे लढून रोखले आहे. मोदी आणि भाजपला देशात बहुमत मुक्त करण्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. आता येत्या विधासनभेलाही शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष ताकदीनं लढतील आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज करतील, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

जागावाटपाचा विचार तुम्ही करू नका. ते योग्यवेळी होईल, तुम्ही राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मजबूत करण्यासाठी काम करा. विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यातील 180 ते 185 जागा जिंकण्याचं महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे. ते लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी बैठकीत दिल्या.

devendra fadnavis | narendra modi | uddhav thackeray
Sharad Pawar : आत्मा हा कायम राहत असतो, भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा मोदींना इशारा

दरम्यान, उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी हा दौरा असेल. या दौऱ्यात बंदिस्त हॉलमध्ये बैठका आणि मेळावे होतील. राज्यभर अशा बैठका होणार आहेत. त्याची तयारी सुरू झाली आहे. दौऱ्याच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असं संजय राऊतांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com