Mohol NCP News : राजन पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची लवकरच सभा; बारसकरांकडून घेतली सोलापूरची खडान्‌खडा माहिती

त्या बैठकीनंतर पवार यांनी बारसकर यांना पुन्हा दोन दिवसांनंतर तातडीने भेटीसाठी मुंबई येथे येण्याचे सांगितले होते.
Sharad Pawar-Ramesh Baraskar
Sharad Pawar-Ramesh BaraskarSarkarnama

Solapur News : मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रथम नगराध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक रमेश बारसकर यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंबईत सिल्व्हर ओकवर बोलावून घेतले होते. पवारांनी त्यांच्याशी सोलापूर जिल्हा आणि मोहोळ तालुक्याच्या राजकारणावर चर्चा केली. पवार यांची माजी आमदार राजन पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या मोहोळ येथे लवकरच सभा होणार आहे, अशी माहिती रमेश बारसकर यांनी दिली. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. (Sharad Pawar will soon hold a public meeting in Mohol)

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले. माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी सभापती मानाजी माने यांनी उपमुख्यमंत्री पवार गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

Sharad Pawar-Ramesh Baraskar
Solapur Politic's : अजित पवारांना धक्का; शहराध्यक्ष अवघ्या आठ दिवसांत शरद पवार गटात सामील

मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी मात्र शरद पवार गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पाच जुलै रोजी मुंबई येथे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या बैठका झाल्या. त्या बैठकीनंतर पवार यांनी बारसकर यांना पुन्हा दोन दिवसांनंतर तातडीने भेटीसाठी मुंबई येथे येण्याचे सांगितले होते. त्यानुसार बारसकर मुंबईत ‘सिल्वर ओक’वर गेले होते.

Sharad Pawar-Ramesh Baraskar
Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत नवी घडामोड; सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर होणार फैसला

दरम्यान, आगामी निवडणुकांसंदर्भात कोण कोणते मित्रपक्ष सोबत आहेत. नवीन येणार आहेत, या बाबतीत व्यूहरचनेसंदर्भात चर्चा झाल्याचे बारसकर यांनी सांगितले. तसेच, तुमच्या तालुक्यात पावसाची काय परिस्थिती आहे? शेतकऱ्यांच्या अडचणीचीही पवार यांनी माहिती घेतली. शरद पवार सध्या मतदारसंघनिहाय दौरे करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लवकरच मी मोहोळ येथेही सभा घेणार आहे, असेही पवार यांनी सांगितल्याचे बारसकर यांनी नमूद केले.

Sharad Pawar-Ramesh Baraskar
Baramati Loksabha : बारामती माझा आत्मा; तेथून लोकसभा लढण्याची अंतिम इच्छा; महादेव जानकरांनी दंड थोपटले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पातळीवर कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रभारी तालुका अध्यक्ष म्हणून रमेश बारसकर यांची जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी नियुक्ती केली आहे. लवकरच तालुका कार्यकारणी निवडण्यात येणार असल्याचे बारसकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com