Nashik News, 28 May : नाशिक शहर नोटांच्या छपाईसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, येथे काही जणांनी बनावट नोटांची छपाई सुरू केल्याचे आढळले आहे. या नोटा वितरित करणारे पोलिसांच्या हाती लागले.
यासंदर्भात अंबड पोलिसांना बनावट नोटांचे रॅकेट उघड करण्यात यश आले आहे. पोलिस उपयुक्त मोनिका राऊत, पोलिस निरीक्षक शेखर देशमुख आणि दिलीप ठाकूर यांच्या तपास पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात संदीप दिलीप भुरे यांनी पोलिसांना एक व्यक्ती 15 हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी सिडको येथे येत असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी माऊली लॉन्स येथील जगदंबा वडापाव स्टॉलवर एक व्यक्ती आली. अशोक अण्णा पगार असं त्या व्यक्तीचं नाव. पगार याच्याकडे पाचशे रूपयांच्या 30 बनावट नोटा आढळल्या. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संशयित पगार याची चौकशी केली असता, तो सिन्नर येथील रहिवासी आढळला. नवी मुंबई बनयेथील हेमंत कोल्हे तसेच नंदकुमार तुकाराम मुरकुटे, सिन्नर आणि भानुदास वाघ, नांदूर शिंगोटे, सिन्नर हे तिघे स्कॅनर आणि प्रिंटरच्या मदतीने पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करीत असल्याचे आढळले. त्यामुळे या सर्व जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून किती नोटांची छपाई झाली आहे. किती नोटा वितरित करण्यात आल्या. आरोपींचा कोणाशी संबंध आहे? यामध्ये राजकीय नेते अथवा अन्य रॅकेट तर नाही याचा शोध घेतला जात आहे.
नाशिक शहरात यापूर्वी बनावट नोटा छापून वितरित करण्याचे मोठे रॅकेट आढळले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याचा थेट सहभाग होता. या नेत्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे बनावट नोटांचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.