Bhusawal APMC Election: एकनाथ खडसे देणार भाजपच्या आमदार सावकारेंना शह!

Bhusawal Bazar Samiti Election: बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सावकारे गटाला शह देण्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी आले एकत्र.
Eknath Khadse & Sanjay Savkare
Eknath Khadse & Sanjay SavkareSarkarnama

Market Committee Election: एकमेकांचे कट्टर विरोधक आमदार एकनाथ खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी भुसावळ बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र आले आहेत. प्रतिस्पर्धी आमदार संजय सावकारे यांच्याविरोधात ही आघाडी झाली. त्यामुळे जळगावच्या राजकारणात सर्वात चर्चीत निवडणूक ठरली आहे. (NCP leader Eknath Khadse & Santosh Choudhary came togather in APMC election)

जिल्ह्याचे (Jalgaon) लक्ष या निवडणुकीकडे (Election)) लागून आहे. दरम्यान, भाजपचे (BJP) आमदार संजय सावकारे यांच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. गंमत म्हणजे दोन्ही गटांनी पॅनलचे नाव शेतकरी विकास असे ठेवले आहे.

Eknath Khadse & Sanjay Savkare
Kolhapur Politics:राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक पुन्हा गुलाल उधळणार की सतेज पाटील सत्ता खेचून आणणार?आज निकाल

या निवडणुकीच्या आखाड्यात १८ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत. बोदवड उपबाजार समितीच्या विभाजनाबाबत पणन सचिवांनी आदेश काढल्याने निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे होती. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका करण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

या निवडणुकीत आमदार एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी आणि आमदार संजय सावकारे या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या पॅनलमध्ये लढत होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही बाजुच्या नेत्यांनी 'शेतकरी विकास पॅनल'च्या माध्यमातूनच उमेदवारांची घोषणा केली आहे.

Eknath Khadse & Sanjay Savkare
MVA News: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल, शरद पवारांकडे 'हा' प्रस्ताव दिल्याची चर्चा...

पणन संचालकांनी राज्य निवडणूक सहकार प्राधिकरणाला बोदवड उपबाजार समितीचे मुक्ताईनगरातून विभाजन करून ती भुसावळ बाजार समितीला संलग्न करण्याबाबत पत्र दिले होते. त्यामुळे मुक्ताईनगरसह भुसावळ बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची चर्चा होती.

दरम्यान, शेलवड ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी व शेमळदे (ता. मुक्ताईनगर) येथील विकासो सदस्य संजय पाटील यांनी त्या विरोधात याचिका दाखल करीत निवडणुकीला स्थगितीची मागणी केली होती. निवडणूक झाली तरी निर्वाचीत सदस्यांचा कालावधी कमी असणार हा मुद्दा याचिकेद्वारे मांडण्यात आला होता. मात्र खंडपीठाने ही याचिका फेटाळली.

Eknath Khadse & Sanjay Savkare
Ashish Deshmukh News : सावनेरमध्ये भाजप डॉ. आशिष देशमुखांवर डाव खेळणार? बावनकुळेंच्या भेटीनंतर रंगली चर्चा !

भाजपचे आमदार संजय सावकारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी, आमदार एकनाथ खडसे यांच्या पॅनलमधून कोणाचे पॅनल विजय होणार, याकडे लक्ष लागले आहे. भटक्या-विमुक्त जाती मतदारसंघात मोहम्मद नथू गवळी व जितेंद्र काटे हे दोन अपक्ष उमेदवार आघाड्यात आहेत.

कोण मारणार बाजी?

एकनाथ खडसे व संतोष चौधरी गटाने शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. आमदार सावकारे प्रणित शेतकरी विकास पॅनलचे देखील सर्व जागांवर उमेदवार आहे. इतिहासात कधीही एकाच पॅनलद्वारे दोघा प्रतिस्पर्थ्यांनी निवडणूक लढण्याचे उदाहरण ऐकिवात नाही. मात्र यंदाच्या निवडणुकीत दोघा बाजूने शेतकरी विकास पॅनलच्या नावाने निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोणता शेतकरी विकास पॅनलचा कोणता गट बाजी मारेल, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com