Manmad APMC Result: आमदार कांदे १ तर महाविकास आघाडीला ३ जागा

हाती आलेल्या चार निकालात कांदे यांना १ तर महाविकास आघाडीला ३ जागा
Suhas Kande & Chhagan Bhujbal
Suhas Kande & Chhagan BhujbalSarkarnama

Manmad APMC Election: मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि महाविकास आघाडीमध्ये कांदे की टक्कर आहे. पहिल्या चार निकालात कांदे गटाला एक तर महाविकास आघाडीला ३ जागा मिळाल्या आहे. (MLA Suhas Kande and Mahavikas Aghadi tough fight)

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी स्वतः लक्ष घातले होते. आमदार कांदे यांनी मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला होता. त्यात प्रारंभीचा कल पाहता चुरशीचे वातावरण आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी स्वतः लक्ष घातले होते. आमदार कांदे यांनी मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला होता. त्यात प्रारंभीचा कल पाहता चुरशीचे वातावरण आहे.

Suhas Kande & Chhagan Bhujbal
Dhamangaon APMC Election Result : धामणगावात माजी आमदारांनी विद्यमान आमदारांना चारली धूळ !
Summary

मनमाड बाजार समितीच्या मतमोजणीत दोन्ही पॅनेलमध्ये चुरस आहे. ग्रामपंचायत गटात अनु.जाती गटामध्ये शिवसेना शिंदे गटाचे लहिरे दशरथ बबन (१०७) हे विजयी झाले. महाविकास आघाडीचे फुलमाळी कैलास खंडू (१०१) हे पराभूत झाले.आर्थिक दुर्बल गटात महाविकास आघाडीचे योगेश दुर्योधन (१०५) हे विजयी झाले तर शिवसेना शिंदे गटाचे आहेर संजय प्रभाकर (१०२) पराभूत झाले.

सर्वसाधारण गटात महाविकास आघाडीचे सुभाष उगले (१०५), गंगाधर बिडगर (११३), विजयी झाले.येथे शिंदे गटाचेराजेंद्र गिडगे (८३) आणि बाळासाहेब आव्हाड (१००) यांचा पराभव झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com