Tribal Corruption : आदिवासी योजनेतील गैरव्यवहार, मास्टरमाईंड संदीप पाटील अटकेत

Tribal corruption NCP Politics : पॅनलचा नेता असलेल्या संदीप पाटील यांनी ग्रामपंचायतचा निधी लाटला होता. निवडणुकीत त्याने गावातील अशिक्षित आणि फारसे व्यवहार ज्ञान नसलेल्या उमेदवारांना पॅनलमध्ये घेतले होते.
tribal corrupation
tribal corrupationSarkarnama
Published on
Updated on

Tribal corruption News : निवाणे (कळवण) ग्रामपंचायत आदिवासी कामातील लाखो रुपयांच्या गैर व्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात सरपंच व सदस्यांच्या अशिक्षित पणाचा गैरफायदा घेऊन भ्रष्टाचार झाला होता.

निवाणे या आदिवासी ग्रामपंचायतीमध्ये संदीप उर्फ महेश पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याशी जवळीक असलेल्या नेत्याचे पॅनल सत्तेत आहे. निवडणुकीत त्याने गावातील अशिक्षित आणि फारसे व्यवहार ज्ञान नसलेल्या उमेदवारांना पॅनलमध्ये घेतले होते.

निवडून आल्यानंतर यातील सरपंच आणि पेसा समितीचे अध्यक्ष यांच्या अशिक्षित पणाचा गैरफायदा घेतला. गावातील विविध विकास कामांच्या नावे आलेल्या सुमारे 50 लाख रुपयांच्या निधीत अफरातफर करण्यात आली. या कामाच्या कागदपत्र आणि धनादेशांवर संबंधित सदस्य आणि सरपंचांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या.

त्यातून सुमारे 30 लाख रुपये थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या संदीप पाटील यांच्याकडे वळते करण्यात आल्याचे बोलले जाते. याबाबत ग्रामसेवकाने संबंधित सदस्यांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेऊन त्यांना कोणतीही माहिती दिली नव्हती.

tribal corrupation
Sharad Pawar : "विधानसभा निवडणुकीत जनतेचा वेगळा 'मूड' दिसून येईल", शरद पवारांना विश्वास

याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंधरा दिवसांपूर्वी पंचायत समितीला आदेशित करून कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवकांचं काही सदस्यांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या सरपंच ग्रामसेवक आणि इतर सदस्यांना नुकताच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अटक केलेल्या सदस्यांनी या प्रकरणात आपण कोणताही आभार केला नसल्याचे पोलिसांना (Police) सांगितले होते.

याबाबत यशोदाबाई विठोबा माळी यांनी पोलिसांना जबाब लिहून दिला आहे. त्यात ग्रामसेवक आणि संबंधितांनी गावामध्ये विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी तुमच्या कागदपत्रांवर सह्या हव्या आहेत. असे सांगत आपल्या सह्या व अंगठा घेण्यात आला होता.

यासंदर्भात किती शासकिय निधी आला. त्याचा विनियोग कसा झाला. याबाबत काहीही माहिती नाही. आपण कोणताही आभार केलेला नाही. या जबाब त्यांनी म्हटले आहे की, पॅनलचे नेते संदीप पाटील (Sandeep Patil) हे स्वतःच ठेकेदार आहेत.

tribal corrupation
Sharad Pawar Vs Ajit Pawar News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवारांकडून देवळालीत मोठा धक्का!

त्यांनीही कामे करण्याच्या बहाण्याने संबंधित पैसे स्वतःकडे वर्ग केले. असा जबाब दिला होता. त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील मास्टर माईंड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांशी जवळीक असलेल्या संदीप उर्फ महेश पाटील यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

हे प्रकरण 2016 ते 2021 कालावधीतील आहे. 2021 मध्ये सत्तांतर झाले सत्तेत आलेल्या पदाधिकार्‍यांनी या गैर व्यवहाराचा पाठपुरावा केला. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस येऊन कारवाई झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com