Shocking: अत्याचारग्रस्त मुलीला न्यायासाठी ४२ दिवस मिठात पुरला मृतदेह

खडक्या (ता. धडगाव) येथे मुलीचा मृतदेह मिठामध्ये पुरण्यात आला ती शेतातील जागा दाखविताना मुलीचे वडील व ग्रामस्थ.
Trible with Girl deadbody
Trible with Girl deadbodySarkarnama
Published on
Updated on

नंदुरबार : खडक्या (ता. धडगाव) (Nandurbar) येथे विवाहित मुलीवर (Married girl) सामूहिक अत्याचाराची (Mass Atrocity) घटना घडली असून, तिला आत्महत्या (suicide) दाखविण्याचा प्रयत्न झालेला आहे. मुलीच्या बापाने याबाबत पोलिसांना (Police) सांगूनही तिचे शवविच्छेदन दूरच, केवळ आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात उघडकीस आला. (Nandurbar police ignore fathers complain of mass atrocity towards girl)

Trible with Girl deadbody
Jalgaon News: अजित पवार आज गिरीश महाजनांची खरडपट्टी काढणार?

पोलिसांनी लक्ष न दिल्याने मुलीला न्याय मिळावा यासाठी पालकांनी तब्बल ४२ दिवसांपासून तिचा मृतदेह मिठामध्ये राखून ठेवला आहे. मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन करण्यात यावे, तसेच जोपर्यंत संबंधित दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा पालकांसह ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, या प्रकाराला तब्बल ४२ दिवसांनी वाचा फुटल्याने पोलिसांनी सारवासराव करत तीन संशयितांना अटक केली आहे.

Trible with Girl deadbody
Eknath Shinde: खासदार हेमंत गोडसेंचा शिवसेनेला धक्का

खडक्या येथील विवाहित मुलीला वावी (ता. धडगाव) येथील रहिवासी व अन्य एकाने गेल्या १ ऑगस्ट २०२२ ला बळजबरी गाडीवर बसवून पळवून नेले. त्यानंतर पीडित विवाहितेने तिच्या नातलगांना सांगितले, की वावी येथे रणजित ठाकरेसह चार जणांनी तिच्यावर अत्याचार केला असून, ते मला मारून टाकतील, असे सांगत घटनास्थळाचे फोटोही विवाहितेने नातेवाइकांना पाठविले होते. त्यानंतर तिचे कुटुंबीय वावी येथे गेले असता विवाहिता आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह आंब्याच्या झाडावरून खाली उतरविण्यात आला, असे तिच्या पालकांकडून सांगण्यात येत आहे.

पीडितेवर बलात्कार झाल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगूनदेखील तिच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झालेली आढळून आली नाही. आंब्याचे झाड उंच असून, त्या ठिकाणी विवाहिता कशी चढू शकते, असा प्रश्‍न कुटुंबीयांनी उपस्थित केला. तसेच विवाहितेच्या मृत्यूपूर्वी व्हायरल झालेल्या क्लिपबाबतही पोलिसांनी फारशी गांभीर्याने दखल घेतलेली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याबाबत पोलिसांनी सुरवातीला आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. वावी येथील रणजित ठाकरेसह तिघांना अटक केली आहे. त्या मुलीचा मृतदेह कुटुंबीयांकडे अंत्यसंस्कारासाठी सोपविण्यात आला होता. मात्र मुलीच्या पित्याने जोपर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार करत घराशेजारच्या शेतात खड्डा करून मुलीचा मृतदेह मिठामध्ये पुरून ठेवला आहे. त्यानंतर कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी धडगाव पोलिस ठाण्यासह थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर पीडित युवतीचे पुन्हा शवविच्छेदन करण्याच्या सूचना धडगाव पोलिसांना दिल्या.

पीडितेच्या मृत्यूपूर्वी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची तपासणी करण्यात येत आहे. यात काही तथ्य आढळल्यास वाढीव कलमे लावण्यात येतील. याबाबत धडगाव येथील तहसीलदारांशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

-श्रीकांत घुमरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, शहादा

---

माझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली नसून तिच्यावर नराधमांनी अत्याचार केलेला आहे. त्यानंतर झाडावर लटकविण्यात आले आहे. तिला न्याय मिळण्यासाठी तिचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे, जोपर्यंत पुन्हा शवविच्छेदन होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही.

-पीडितेचे वडील.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com