Breaking News; शिवसेना महानगरप्रमुख बडगुजर यांना एक वर्ष कारावास!

नाशिक न्यायालयाने शिवसेनेच्या तिघांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली
Sudhakar Badgujer
Sudhakar BadgujerSarkarnama

नाशिक : शिवसेना (Shivsena) नेते व माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना आज नाशिकच्या (Nashik) सत्र न्यायालयाने शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या खटल्यात दोषी ठरवले. त्यांना एक वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे शहर शिवसेनेत खळबळ उडाली आहे. (Shivsena leader Sudhakar Badgujar Found guilty by court)

Sudhakar Badgujer
Balasaheb Thorat : या आहेत बाळासाहेब थोरातांचे राजकीय वारसदार?

सध्या शहरात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात तीव्र राजकीय संघर्ष सुरु आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शिवसेनेसाठी धक्का मानला जातो. त्यामुळे ही शिक्षा चर्चेचा विषय आहे.

Sudhakar Badgujer
Chinchwad By-Election : 'सोडून गेलेले सटरफटर, शिवसेना स्थापनेत त्यांचा काडीचाही संबंध नाही'; अजित पवारांनी डिवचलंं...

लोकसभेच्या निवडणुकीत 2014 मध्ये शासकीय कामकाजात अडथळा आणल्याने हा पोलिसांनी बडगुजर यांच्या विरोधात खटला दाखल केला होता. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, यांसह ज्ञानेश्वर वासुदेव बडगुजर आणि राकेश निंबा शिरसाठ या तिघांना न्यायालयाने या खटल्यात दोषी ठरवले. त्यात एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

सिडको येथील लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु असताना केंद्रावर गर्दी झाली. यावेळी राजकीय पक्षांच्या समर्थकांत वाद होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मतदान केंद्रावर माजी नगरसेवक बडगुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त हेमराज राजपूत यांच्याशी वाद घातला. अरेरावी केली. त्यातून शासकीय कामकाजात अडथळा आणला असा गुन्हा अंबड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com