फक्त चर्चेनेच सुरु झाला लताबाई सोनवणे यांच्या मंत्रीपदाला विरोध!

सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना मंत्री मंडळात स्थान देऊ नये अशी मागणी सुरु आहे.
MLA Latabai Sonawane
MLA Latabai SonawaneSarkarnama
Published on
Updated on

नंदुरबार : जातपडताळणी समितीने (Cast validity committee) जातीचा दाखला अवैध (Cast certificate invalid) ठरविलेल्या चोपडाच्या आमदार लताबाई सोनवणे (Latabai Sonawane) यांना मंत्री म्हणून शपथ देण्यात नये, अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे (Trible students Organisation) राज्याध्यक्ष अर्जुनसिंग वसावे (Arjunsingh Vasave) यांनी केली आहे. (Latabai sonawane`s trible cast certificate was invalid)

MLA Latabai Sonawane
`साहेब, आम्ही गद्दार नाही, तुम्हाला सोडून जाणार नाही`

याबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, लताबाई महारू कोळी या चोपडा मतदार संघातून (एसटी) अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून टोकरे कोळी जमातीचा दावा करून २०१९ च्या विधानसभेत निवडून आल्या होत्या. त्यांचा टोकरे कोळी जमातीचा दावा जात पडताळणी समितीने अवैध घोषित केल्यावर त्यांनी आधी औरंगाबाद उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

MLA Latabai Sonawane
चंद्रकांत रघुवंशी आमदारकीच्या लालसेने शिंदे गटात गेले!

सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण पुर्नतपासणीसाठी जात पडताळणी समितीकडे वर्ग केल्यानंतर नंदुरबारच्या जात पडताळणी समितीने लताबाई कोळी यांचे टोकरे कोळी जातीचा दावा ९ फेब्रुवारी २०२२ रोजी अवैध ठरविला होता. सदर आदेश लता कोळी (सोनवणे) यांनी उच्च न्यायालयात आव्हानीत केला होता. त्यावर उच्च न्यायालयाने१० जून २०२२ रोजी आदेश पारित करून आमदार लताबाई यांची याचिका फेटाळून लावली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केली असून श्री. शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदार लता सोनवणे यांना राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथविधी होण्याच्या हालचाली सुरू आहेत. पार्श्वभूमी लक्षात घेता आमदार लता सोनवणे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग वसावे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com