Trupti Desai News: मोठी बातमी: तृप्ती देसाईंच्या अडचणी वाढणार! गुन्हा नोंदवताच भाजप जिल्हाध्यक्षानं दिला मोठा इशारा

Ahilyanagar Politics : उत्तर नगर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.
Trupti Desai
Trupti DesaiSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : उत्तर नगर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी नितीन दिनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात तृप्ती देसाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृप्ती देसाई यांनी आपल्या निवेदनात “नितीन दिनकर हे महिलांना भाजपमधील पद देण्याचे आमिष दाखवून ढाब्यावर पार्ट्यांचे आयोजन करतात, नाचगाण्याचे कार्यक्रम घेतात आणि रात्री उशिरापर्यंत महिलांना थांबवून त्यांचा मानसिक छळ करतात. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही त्यांना पोलिस संरक्षण मिळाल्यामुळे कोणीही विरोध करण्यास घाबरते,असं म्हटलं आहे.

त्याचबरोबर त्यांनी आरोप केला, “नितीन दिनकर हे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrishna Vikhe Patil) यांचे अत्यंत निकटवर्तीय असून, त्यांच्याच राजकीय पाठबळावर त्यांना पोलिस संरक्षण मिळाले आहे. या संरक्षणाचा ते महिलांवर दबाव टाकण्यासाठी गैरवापर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नाही.”

तसेच त्यांनी अहिल्यादेवी होळकरांच्या नावावर जिल्ह्याचे नामकरण करून महिलांचा सन्मान केला जात असताना, पक्षातीलच पदाधिकाऱ्याकडून महिलांवर अन्याय होतोय हे लज्जास्पद असल्याचंही देसाई म्हणाल्या. त्याचमुळे नितीन दिनकर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने दूर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Trupti Desai
Hasan Mushrif Vs Ghatge: विकासापेक्षा मुश्रीफ-घाटगेंचा 'इगो' ठरला मोठा; बड्याच्यावाडीचं आरोग्य 'व्हेंटिलेटर'वर!

दरम्यान, या आरोपांना उत्तर देताना नितीन दिनकर यांनी स्पष्ट केले की, “सदर व्हिडिओ माझ्या कौटुंबिक कार्यक्रमातील असून तो एडिट करून खोटे आरोप करत तृप्ती देसाई यांनी माझी, माझ्या कुटुंबीयांची आणि अल्पवयीन नातेवाईक मुलीची बदनामी केली आहे. यामागे राजकीय द्वेष असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी.”

या पार्श्वभूमीवर, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की, “दिनकर यांच्या तक्रारीवरून तृप्ती देसाई यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाच्या परवानगीने पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.”

Trupti Desai
Bala Nandgaonkar: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा अन् मनसेच्या नांदगावकरांचं मोठं विधान; म्हणाले,'शिंदे ग्रेटच, उद्धव यांनी...'

या प्रकरणामुळे भाजपच्या जिल्हा राजकारणात खळबळ उडाली असून, आगामी काळात पक्षाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com