
Kolhapur News: कागल विधानसभा मतदारसंघातील बड्याच्यावाडीतील रस्ता नसल्याने आजारी रुग्णाला चिखल, खाचखळग्यातून बैलगाडीतून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याच मतदारसंघात हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
मात्र, वस्तुस्थिती पाहता त्याला दोन गटातील वाद जबाबदार आहे की काय? अशी शंका उपस्थित होत आहे. कागल विधानसभा मतदारसंघात मुश्रीफ-घाटगे गटाचा वाद यांना त्या कारणाने धुमसत आहे. या रस्त्याचे राजकारण ही त्याच पद्धतीने असल्याने अनेक वर्षांपासून हा रस्ता रखडल्याचे समोर येत आहे.
कागल विधानसभा मतदारसंघात गावागावात मुश्रीफ आणि घाटगे गटाचे गट आहे. बड्याच्यावाडीतील गावात सध्या समरजीत घाटगे (Samarjeet Ghatge) गटाची सत्ता आहे. तर आमदार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहेत. एकीकडे विधानसभा निवडणुकीतून याच गावातून यांना कमी मताधिक्य मिळाल्याची माहिती आहे. खोरी वस्तीतील बहुतांश लोक घाटगे गटाचे असल्याचे सांगितले जाते. घाटगे यांच्या प्रचारात वस्तीवरील काही लोक असल्याने प्रशासकीय स्तरावर या रस्त्याचा मार्ग निघत नसल्याची चर्चा वायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगवरून समोर येत आहे.
तर दुसरीकडे 26 जून रोजी तहसीलदार शेळके यांनी आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायत पातळीवर या रस्त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. ग्रामस्थांनी आजारी आणि गरोदर स्त्रियांची माहिती देऊन देखील ग्रामपंचायत पातळीवर स्थिती जैसे थे ठेवण्यात आली. राज्यस्तरावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदार संघातील रस्त्याची खराब अवस्था दाखवले जावी असे व्यवस्था काहींना करायची होती. असे देखील समोर येत आहे. वास्तविक राजकारण दोन्ही गटाचं होईल, मात्र मरण ग्रामस्थांचं येईल अशी भावना सध्या या वस्तीवरील लोकांची आहे.
खोरी वसाहतीतील समस्थाना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रवास करण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने आजारी रुग्णांना बैलगाडीतून प्रवास करावा लागत आहे. गुडघाभर कलातून शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. वस्तीवरील गर्भवती स्त्रियांना इतर गावात ठेवण्यात आले आहे. प्रशासकीय स्तरावर न्याय मागून देखील, आता होत नसल्याने ग्रामस्थांनी आता हातबलता व्यक्त केली आहे.
प्रस्तुत प्रकरणी मा.दिवाणी न्यायालयाचे मनाई आदेशाचे उल्लंघन न करता व सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या मूळ हद्दीस कोणत्याही प्रकारची बाधा न करता मौजे.बडयाचीवाडी हद्दीतील खोरी वसाहतीपासून मूळ गावाला जोडणारा पूर्वापार वहिवाटीतील गाडीवाट व सार्वजनिक रस्त्याची तात्पुरते स्वरूपात डागडुजी करणेत यावी. केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करणेत यावा.
तसेच सदर रस्त्याची डागडुजी न केलेमुळे गरोदर माता,वयोवृद्ध व्यक्ती, शालेय विद्यार्थी व अन्य नागरिक यांचे जीवितास धोका निर्माण झालेस अथवा जीवित हानी झालेस आपत्ती व्यस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत मौजे.बड्याचीवाडी यांची राहिल याची नोंद घेणेत यावी,असे आदेश गडहिंग्लज तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी 26 जून 2025 रोजी दिले आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही या रस्त्यासंदर्भात पाठपुरावा करत आहोत. प्रशासनाने वेळीच आम्हाला आदेश दिले नाहीत. पावसाळ्याच्या तोंडावर आणि सध्या परिस्थिती पाहता या रस्त्याचे काम करणे ते वाटत नाही. असे स्पष्टीकरण बड्याचीवाडीचे सरपंच यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.