Tukaram Mundhe FDA action : तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाजपणानं शिर्डीतील भेसळमाफिया धास्तावले! साईंच्या नावावर विकले जाणारे ‘चिरंजीव पेढे’ रडारवर

FDA action Shirdi exposes alleged adulteration famous pedas amid growing public concern : अन्न व औषध प्रशासनाला शिर्डीत साईसमाधी मंदिराभोवती विक्री होणाऱ्या पेढ्यांवर बुरशी आढळल्याने वर्षानुवर्षे सुरू असलेल्या ‘साखर पेढा’ रॅकेटवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.
Tukaram Mundhe action Shirdi pedha
Tukaram Mundhe action Shirdi pedhaSarkarnama
Published on
Updated on

FDA raid Shirdi shops : सरकारी वाहनांचा ताफा दिसला तरी ‘मुंढे आले की काय?’ अशी भीती खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये निर्माण झाली असून, प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही मरगळ झटकून कारवाईचा वेग वाढविला आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने साईबाबांच्या शिर्डीतील पेढा विक्रेत्यांच्या दुकानांवर धडक कारवाई करत विविध पेढ्यांचे नमुने संकलित केले.

काही ठिकाणी विक्रीस ठेवलेल्या पेढ्यांवर बुरशी आढळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही मोहीम राबविण्यात आली. तपासणी अहवालात हे नमुने खाण्यास अयोग्य आढळल्यास संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

या कारवाईमुळे शिर्डीतील (Shirdi) प्रसिद्ध पेढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. स्थानिक पातळीवर या पेढ्यांना उपरोधिकपणे ‘चिरंजीव पेढे’ किंवा ‘साखर पेढे’ म्हणून ओळखले जाते. काही जण तर त्यांना ‘कुत्र्यांच्या जिवावर उठलेले पेढे’ असेही संबोधतात.

स्थानिक व्यापारी आणि नागरिकांच्या माहितीनुसार, शिर्डीच्या बाजारपेठेत (Public Issue) दररोज अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांच्या भेसळयुक्त पेढ्यांची विक्री होते. या पेढ्यांमध्ये खव्याचे प्रमाण अत्यल्प असून साखरेचे प्रमाण तब्बल 70 ते 80 टक्क्यांपर्यंत असल्याचा आरोप केला जातो. शुद्ध खव्याचा पेढा सुमारे 500 रुपये किलो दराने विकला जात असताना, हे तथाकथित ‘साखर पेढे’ अवघ्या 200 रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध असतात. नफ्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक दुकानांमध्ये अशाच प्रकारच्या पेढ्यांची विक्री होत असल्याची चर्चा आहे.

Tukaram Mundhe action Shirdi pedha
Tukaram Mundhe FDA Vs Goras Bhandar : तुकाराम मुंढे यांच्या 'FDA'च्या कारवाईवरून वाद; 600 दूध उत्पादक शेतकरी, 5 हजार ग्राहक आक्रमक, मंत्रालयापर्यंत लढा नेण्याची तयारी

‘चिरंजीव पेढे’ चर्चेत आले

‘चिरंजीव पेढे’ हे नाव पडण्यामागेही एक वेगळी कहाणी सांगितली जाते. दुकानात अनेक दिवस विक्री न झालेला माल उत्पादकांकडे परत जातो. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून त्यात पुन्हा साखर आणि खवा मिसळला जातो व नव्या पॅकिंगमध्ये तोच माल बाजारात आणला जातो, असा आरोप स्थानिकांकडून केला जातो. विशेष म्हणजे अनेक पॅकेट्सवर उत्पादन तारीख किंवा वापरण्याची अंतिम मुदत नमूद नसल्याचेही निदर्शनास येते.

Tukaram Mundhe action Shirdi pedha
Operation Tiger Returns? : 'ऑपरेशन टायगर'चं मला काहीच माहिती नाही; शिंदे भेटीवर ठाकरेंच्या शिलेदाराचं ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, वाढवलं राजकीय टेन्शन

तपासणीनंतर पेढ्यातील भेसळखोरांवर कारवाई

सोमवारी सायंकाळी नमुने संकलित केल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी उज्ज्वला पाटील यांनी सांगितले की, सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

नगरपालिका हॉटेल अन् रेस्टॉरंटच्या स्वयंपाकगृहांची तपासणी करणार

दरम्यान, भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही या मोहिमेचे स्वागत केले आहे. भेसळयुक्त पेढे विक्रेत्यांवर कारवाई सुरू झाली असून, नगरपालिकेकडून हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या स्वयंपाकगृहांचीही तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अस्वच्छता किंवा भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. भाविकांनी पेढे खरेदी करताना गुणवत्ता आणि शुद्धतेची खात्री करूनच खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

भेसळीच्या पेढ्यांवरील कारवाईकडे राज्याचे लक्ष

शिर्डीत वर्षानुवर्षे सुरू असल्याचा आरोप असलेल्या या कथित ‘साखर पेढा’ व्यवसायावर आता तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा खरा फटका बसणार का, याकडे राज्यभरातील भाविक आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com