या देशात दोघं विकतात आणि दोघं विकत घेतात

देशात सध्या भांडवलदारांच्या हातात व्यवस्था जात असल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणार आहे.
Jayant Patil, NCP
Jayant Patil, NCPSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : एअर इंडिया मोदीसाहेबांनी विकून टाकली. (Centre sold Air India) एखादा प्लॉट विकला तर इतका दंगा होतो परंतु मोदीसाहेबांनी तर विमानांसहित नरिमन पॉईंटवरील (Inclueding a Building at Nariman Point) एअर इंडियाची इमारतही विकली आहे. असं म्हणतात या देशात दोघं विकतात (Two persone are seller in Country) आणि दोघं विकत घेत आहे, (Two are buyers) असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी सांगितले.

Jayant Patil, NCP
सुरगाण्याच्या प्रत्येक गावात हवी एक ममता बॅनर्जी!

ते पुढे म्हणाले, देशात सध्या भांडवलदारांच्या हातात व्यवस्था जात असल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणार आहे. भांडवलशाहीचे राज्य भाजपच्या माध्यमातून निर्माण होत आहे. सामान्यांना उध्वस्त, असहाय्य करण्याचे काम केंद्रातील सध्याचे सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Jayant Patil, NCP
आमदार देवयानी फरांदे वाचवू शकतात राज्याचे ५०० कोटी?

जयंत पाटील म्हणाले, आज देशाचा कारभार काही नीट सुरू नाही. मागच्या ७५ वर्षांच्या काळात जे कमवलं ते विकण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहे. ज्या देशात टाचणी तयार होत नव्हती, तिथे HAL सारखे प्रकल्प तयार झाले. याची मूहूर्तमेढ माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी रोवली होती.

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचं चांगलं झालेलं तर भाजपला बघवतंच नाही. सोयाबीनला ११ हजारा़चा भाव होता हे मोदींना काही रुचलं नाही. परदेशातून सोयाबीन आणि तेल आयात केलं. परिणामी सोयाबीनचे भाव पडले. या सगळ्यांचा जाब विचारण्यासाठी आपला पक्ष ताकदवान व्हायला हवा. पक्ष ताकदवान होण्यासाठी संघटना सक्षम करावी लागेल. पक्ष ताकदीने बांधायचा असेल तर बुथ कमिट्या सक्षमपणे कराव्यात. या बुथ कमिट्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घ्या. त्या कशा कार्यरत होतील याचा अभ्यास करा.

जिल्ह्यातील कळवण - सुरगणा आणि बागलाण - सटाणा या विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. ते म्हणाले, येथील मतदारांनी कळवण-सुरगाणा मतदारसंघात २०१९ साली राष्ट्रवादीला घवघवीत यश दिले. मागच्या कालखंडात येथे फक्त मोर्चे निघाले, योग्य पाठपुरावा केला नाही तर वेळोवेळी मोर्चे काढावे लागतात. राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार या प्रत्येक गोष्टींचा पाठपुरावा करत आहे.

श्री. पाटील यांनी बागलाण-सटाणा मतदारसंघाच्या उमेदवार दिपीकाताई चव्हाण यांचा पराभव कसा झाला, असा प्रश्न केला. ते म्हणाले, आम्हा सगळ्यांना याचे कोडे अद्याप उलगडले नाही. बागलाणची जागा येणार याचा आम्हाला विश्वास होता. मात्र आपला इथे पराभव झाला. आता पराभवची मरगळ झटकून कामाला लागा.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com