Nagar, 30 March : नगर जिल्ह्यातील शिर्डी (राखीव) आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होईल. मतदान प्रक्रिया सुलभतेने व्हावी, यासाठी नगर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदान केंद्रावर कोणत्याही उणिवा राहू नयेत, यासाठी बैठकांचे सत्र जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे.
नगर जिल्ह्यात ( Nagar district) एकूण 36 लाख 35 हजार मतदार (Voter) असून, यात 2001 मतदार वयाने शंभरी गाठलेले आहेत. कर्जत-जामखेड (Karjat Jamkhed) विधानसभा मतदारसंघात शंभरी गाठलेले सर्वाधिक 287 मतदार आहेत. सर्वात कमी अकोले विधानसभा मतदारसंघात 68 मतदार आहेत. शंभरी गाठलेल्या मतदारांमध्ये एक 110 वयो वर्षांचा, तर एक 120 वयोमान गाठलेले मतदार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शंभरी गाठलेले मतदार विधानसभा मतदारसंघनिहाय
अकोले : 68, संगमनेर : 83, शिर्डी : 131, कोपरगाव : 131, श्रीरामपूर : 149, नेवासे : 139, शेवगाव : 388, राहुरी : 118, पारनेर : 227, नगर शहर : 93, श्रीगोंदा :96, कर्जत-जामखेड : 278.
नवमतदार 46 हजारांवर
नगर जिल्ह्यात पहिल्यांदा मतदान करतील, त्याचा आकडाही मोठा आहे. एकूण मतदारांपैकी वय 18 ते 19 गटातील 46 हजार 539 मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यानंतर 20 ते 30 वयोगटातील 6 लाख 92 हजार 560 मतदार आहेत.
सर्वाधिक मतदार 30 ते 40 वयोगटातील
नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार 30 ते 40 वयोगटातील आहे. सात लाख 90 हजार 357 मतदार आहे. त्याखालोखाल 41 ते 50 वयोगटातील सात लाख 71 हजार 891 मतदार आहे. या मतदारांवर उमेदवारांची भिस्त आहे.
घरबसल्या मतदान करता येणार
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) या वेळी वय 85 झालेल्या मतदारांना आणि दिव्यांगांना घरबसल्या मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. वयोमानाने घराबाहेर पडता येणार नाही, अशांना ही सोय आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरल्याच्या तारखेपासून पहिल्या पाच दिवसांत वय 85 असलेल्यांना जिल्हा निवडणूक शाखा किंवा स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवायचे आहे. तसा अर्ज भरून घेतला जाणार आहे.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.