Loksabha Election 2024 : नगर दक्षिण अन् शिर्डी लोकसभेसाठी जिल्हा प्रशासनाकडून वेग; २२ हजार कर्मचारी नियुक्त

Ahmednagar Loksabha Election : नगर जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली असून, त्यासाठी मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.
voting machine
voting machinesarkarnama
Published on
Updated on

राज्यात राजकीय घमासान सुरू असताना प्रशासकीय पातळीवर लोकसभा निवडणुकीची ( Loksabha Election 2024 ) जोरदार तयारी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यभरातील जिल्हा निवडणूक शाखांकडून निवडणुकीच्या तयारीचा वारंवार आढावा घेतला जात आहे. नगर जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीसाठी 22 हजार 407 कर्मचारी नियुक्त केले आहेत. या शिवाय 16 समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

voting machine
Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दलामध्ये 260 नाविक पदांची भरती; कसा कराल अर्ज?

लोकसभा निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात दोन मतदारसंघ आहे. नगर दक्षिण आणि शिर्डी, असे हे लोकसभा मतदारसंघ आहेत. नगर जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली असून, त्यासाठी मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. याशिवाय निवडणुकीसाठी प्रशासनाने यंत्रणा देखील तयारी सुरू केली आहे. मनुष्यबळाच्या नियुक्तीसह मतदान अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, तालुका पातळीवर स्ट्रॉंग रूम, समन्वय अधिकारी, वाहन व्यवस्था, कम्युनिकेशन यंत्रणा, भरारी पथक आदी कामांचे नियोजन जिल्हा प्रशासन पातळीवर सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहित लागेल. या दोन्ही निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग राज्यातील प्रत्येक जिल्हा निवडणूक शाखेकडून तयारी करून घेत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाला मोठे मनुष्यबळ लागते. या मनुष्यबळाच्या जुळवाजुळवीसाठी विविध विभागाकडे जिल्हा प्रशासन मनुष्यबळ मागून घेत आहे.

voting machine
Mumbai Central Railway : मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा, तब्बल 84 'लोकल' रद्द!

नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी 3 हजार 734 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. नगर शहरात 286 मतदान केंद्र आहेत. या दोन्ही मतदारसंघासाठी राखीव मनुष्यबळासह 22 हजार कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष गरज भासणार आहे. याशिवाय 18 हजार 670 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसह 20 टक्के मनुष्यबळाची अतिरीक्त व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे, अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे.

voting machine
Radhakrishna Vikhe : तलाठी नव्हे, आता 'ग्राम महसूल अधिकारी', महसूल मंत्री विखेंची घोषणा

मतदान केंद्र संख्या

अकोले 307, कोपरगाव 273, शिर्डी 270, श्रीरामपूर 311, नेवासा 270, शेवगाव-पाथर्डी 365, राहुरी 307, पारनेर 365, नगर शहर 386, श्रीगोंदा 344, कर्जत-जामखेड 356, असे एकूण 3 हजार 834 मतदान केंद्र आहेत.

voting machine
Parbhani Municipal Corporation : परभणी महापालिकेत 'या' रिक्तपदांची भरती; वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com