Nashik Defence Cluster : उद्योगमंत्र्यांचं नाशिककडे दुर्लक्ष, मात्र फरांदेंच्या मध्यस्थीनंतर फडणवीसांनी दिलं लक्ष, अन्...

Devyani Pharande and Uday Samant News : उद्योगमंत्र्यांनी एकप्रकारे विरोधकांच्या हाती कोलीत दिल्याचे दिसत आहे.
Devyani Pharande and Uday Samant
Devyani Pharande and Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : पुणे येथे घोषीत करण्यात आलेल्या डिफेन्स क्लस्टरमध्ये नाशिकचा समावेश झाला नाही. उद्योगमंत्र्यांनी एकप्रकारे विरोधकांच्या हाती कोलीत दिले. ही बाब लक्षात घेता आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर तांत्रिक अडथळे दूर झाले असून, आता नाशिकला डिफेन्स क्लस्टर होणार, असा दावा आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.

यामुळे उद्योग मंत्र्यांकडून अन्याय तर उपमुख्यमंत्र्यांकडून नाशिकला न्याय असे चित्र सध्या निर्माण झाले असून, निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांचा हा उद्योग सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो आहे.

नाशिकमध्ये संरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर) उभारण्यासाठी दिंडोरीत नव्याने संपादित केलेल्या अक्राळे किंवा येवल्याजवळील चिंचोडी येथील जागेचा विचार केला जात होता. याच अनुषंगाने उद्योग मंत्रालयाने एमआयडीसीला 25 मे 2019 रोजी पत्र पाठवून या जागांवर असा क्लस्टर शक्य आहे का? याचा अभ्यास अहवाल मागविला होता. यामुळे ‘मेक इन नाशिक’च्या पार्श्वभूमीवर डिफेन्स क्लस्टरकरिता सरकारी पातळीवरील हालचाली सुरू झाल्याचे झाल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुढे मात्र पाच वर्षे या प्रकल्पाचे काय झाले हे गुलदस्त्यातच होते. त्यात काही दिवसांपूर्वी पुणे येथे एम.एस.एम.ई डिफेन्स एक्सपोच्या उद्घाटनात उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी पुणे, रत्नागिरी, शिर्डी व नागपूर येथील संरक्षण साहित्य उत्पादन हबची (डिफेन्स क्लस्टर) घोषणा केली. त्यामुळे नाशिकवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली.

या पार्श्वभूमीवर देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी देखील चर्चा केली. यानंतर नाशिक येथील संरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर) तयार करण्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. आगामी दोन ते तीन दिवसांत याबाबत घोषणा करण्यात करण्यात येईल, असे आमदार देवयानी फरादे यांनी सांगितले. तत्काळ याबाबत कार्यवाही झाली. त्यामुळे एक मोठा उद्योग नाशिकला मिळाला असून, रोजगाराला चालना मिळेल, असा दावा फरांदे यांनी केला.

आता स्काय बसचा प्रकल्प -

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डिफेन्स हबचा प्रकल्प भाजपासाठी(BJP) उपयोगी ठरू शकतो. तसेच उद्योग मंत्र्यांनी तर नाशिकला स्काय बस प्रकल्प राबवण्याचे आश्वासन सुद्धा दिल्याचे फरांदे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी नाशिकला निओ मेट्रो प्रकल्प मिळणार असे सांगण्यात आले होते. मात्र, त्याचे काय झाले, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर डिफेन्स हब आणि स्काय बस प्रकल्प येणार असल्याचा दावा आमदार फरांदे यांच्याकडून करण्यात आल्याने विरोधकांकडून तोंडसुख घेण्यात येत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com