Nashik crime: हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू, भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेंच्या अडचणी वाढल्या

Uddhav Nimes; BJP leader Uddhav Nimse's problems increase as the injured person in the attack dies-राहुल धोत्रे आणि त्याच्या कुटुंबीयांवर उद्धव निमसे समर्थकांनी सशस्त्र हल्ला केला होता. हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Shivsena-UBT-leader-Prathmesh-Gite-BJP-Leader-Uddhav-Nimse
Shivsena-UBT-leader-Prathmesh-Gite-BJP-Leader-Uddhav-NimseSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Nimse News: भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि त्यांच्या समर्थकांनी धोत्रे कुटुंबीयांवर सशस्त्र हल्ला केला होता. यातील जखमी युवकाचा आज सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे.

नाशिक शहरात गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. दहशत निर्माण करण्यासाठी विविध भागात वाहनांची तोडफोड आणि हल्ले होत आहेत. नुकतेच नांदूर नाका येथे धोत्रे कुटुंबीयांवर असाच सशस्त्र हल्ला झाला होता. यातील जखमी युवकाचा आज सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

जखमी युवकाचा आज सकाळी रुग्णालयात मृत्यू झाल्याने आता आडगाव पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे. यासंदर्भात पोलिसांनी यापूर्वीच हल्लेखोरांपैकी काहींना अटक केली होती. मात्र यामध्ये भाजप नेते उद्धव निमसे यांच्यावर थेट हल्ल्यात सहभागी असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Shivsena-UBT-leader-Prathmesh-Gite-BJP-Leader-Uddhav-Nimse
Nashik Crime: नाशिक हादरले; नाशिकमध्ये पुन्हा युवती ठरली एकतर्फी प्रेमाचा बळी ठरलेल्या युवतीची आत्महत्या!

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धोत्रे कुटुंबीयांनी समर्थकांसह पोलीस ठाण्यात कारवाईची मागणी केली होती. पोलिसांच्या कारवाईबाबत समाधान न झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते आणि पदाधिकाऱ्यांसह धोत्रे कुटुंबीयांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती.

हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे असल्याने भाजपचे नेते उद्धव निमसे यांनी अटकपूर्व जामीन्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यांना सुरुवातीला दोन दिवसांचे अटकेपासून संरक्षण देण्यात आली होते. गुरुवारी त्यांना पुन्हा एक दिवस अटकपूर्व जामीन वाढवून देण्यात आला. मात्र आज जखमी युवकाचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे.

उद्धव निमसे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. सत्ताधारी मंत्र्यांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस आणि प्रशासन सक्रिय असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. याबाबत धोत्रे कुटुंबीय देखील आक्रमक असून गुन्हेगारांवर कारवाईसाठी ठाम आहेत. आता जखमी युवकाचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com