Uddhav Thackeray : उष्माघातामुळे मुंबईत नको ते घडलं; उन्हामुळे उद्धव ठाकरेंनी 10 मिनिटात आटोपला कार्यक्रम

Uddhav Thackeray Jalgaon News : उद्धव ठाकरे यांनी जळगावकरांना दिले पुन्हा येण्याचे आश्वासन
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama

Jalgaon News : उष्माघातामुळे मुंबईत गेल्या आठवड्यात दुर्दैवाने नको ते घडल, त्यामुळे आपण पिंप्राळयात जनतेच्या काळजीने त्यांना उन्हाचा त्रास होवू नये, म्हणून बोलणार नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिल्यानंतर तीन महिन्यांनी पुतळ्याच्या अनावरणासाठी अवश्‍य येणार आहोत. अशी ग्वाही शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली.

पिंप्राळा येथील उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. शहरातील पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याच्या भूमीपूजनासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सौ. रश्‍मी ठाकरे उपस्थित होत्या.

Uddhav Thackeray News
Ajit Pawar On Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले, '१५ दिवसात सरकार कोसळणार' तर अजित पवार म्हणतात..

उन्हामुळे जनतेला त्रास होवू नये म्हणून या कार्यक्रमास धावती भेट दिली. प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला, व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी उद्धव ठाकरे व रश्‍मी ठाकरे यांचे पुष्पगुच्छ तसेच स्मृतीचिन्ह देवून स्वागत केले.

त्यानतंर महापौर जयश्री महाजन यांनी रश्‍मी ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी उशीरा कार्यक्रमास आल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली, उन्हामुळे आपण मोठे भाषण करणार नाही, असे स्पष्ट करतांना ते म्हणाले, गेल्या आठवड्यात उष्माघातामुळे मुंबईत नको ते घडले, त्यामुळे आपण जनतेची काळजी घेवून दुपारचा कार्यक्रम घेणार नव्हतो, परंतु ऐकेल तो शिवसैनिक कसला, त्यांच्या आग्रहखातर आपण या ठिकाणी केवळ हजेरी लावली आहे.

Uddhav Thackeray News
Gulabrao Patil 400 crore scam: राजकारण तापलं! 'गुलाबराव पाटलांनी कोरोना काळात ४०० कोटींचा घोटाळा केला; राऊतांचा गंभीर आरोप

आपण जनतेची माफी मागतो. मात्र, आपण तीन महिन्यांनी या पुतळयाचे काम पूर्ण झाल्यावर अनावारणासाठी नक्की येणार आहोत, त्यावेळीही जनतेला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही अशीच वेळ आपण घेणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com