Uddhav Thackeray News : विखेंच्या बालेकिल्ल्यात येऊन ठाकरेंनी थोरातांवर उधळली स्तुतिसुमनं

Uddhav Thackeray Praises Balasaheb Thorat : उद्धव ठाकरेंनी थोरातांचे कौतुक करत एका दगडात मारले दोन पक्षी?
Uddhav Thackeray, Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe Patil
Uddhav Thackeray, Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Shirdi Politics News :

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच शिर्डी मतदारसंघाचा दौरा केला. त्यांचा हा दौरा लोकसभा निवडणूक प्रचाराचा होता. यानिमित्ताने ठाकरे यांनी महाविकास आघाडीची मोळी घट्ट करण्यासाठी प्रयत्न केले. शिर्डी येथील सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची ठाकरे यांनी केलेली स्तुती चर्चेचा विषय ठरली.

या वेळी झालेल्या सभेत ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील अनुभव सांगितले. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा अगदीच नवखा होतो. मला काहीच माहीत नव्हतं. मी महापालिकेतसुद्धा केवळ शिवसेनेचे महापौर निवडून यायचे, त्यांचे अभिनंदन करायला जात होतो. यापुढेदेखील जाणार. विधानसभेच्या आजूबाजूलादेखील कधीही फिरलो नव्हतो. मंत्रालयात कधी गेलो नव्हतो. अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं, असं Uddhav Thackeray म्हणाले.

Uddhav Thackeray, Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe Patil
Vinayak Deshmukh : 'आता शेवट भाजपमध्येच...'; काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर देशमुख थेट भाजपच्या व्यासपीठावर

'त्यांनी मला सांभाळून घेतलं'

ठाकरे यांनी या वेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर अक्षरशः स्तुतिसुमनं उधळली. "बाळासाहेब थोरात यांच्यासारखा एक ज्येष्ठ सहकारी, ज्याला तुम्ही किती वर्षे विश्वास ठेवून निवडून देत आहात. ते अनुभवी आहेत. मात्र, या सगळ्या सहकाऱ्यांत मी नवीन होतो. मी नवीन आहे, असं कधी त्यांनी मला भासू दिलं नाही. त्यांनी मला सांभाळून घेतलं. याला मनाचा मोठेपणा लागतो. दिलदारपणा लागतो. माझ्यापेक्षा ते अनुभवाने मोठे आहेत. त्यांच्या कामानेदेखील मोठे आहेत. तरीही त्यांनी मला एकटं पडू दिलं नाही," असं कौतुक ठाकरे यांनी केलं.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून ठाकरे यांनी आपल्या भाषणात डॉ. विखे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्याचवेळी थोरात यांची मात्र स्तुती केली. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील थोरात यांच्या पाठीराख्यांना नक्कीच शहारून आले असणार.

महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील समन्वय, अर्थात शिर्डी मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला लाभदायी ठरावी, यासाठी केलेली साखर पेरणी म्हणूनच ठाकरे यांच्या या भाषणाकडे पाहिले जाते. ठाकरेंचा दौरा संपल्यावरही त्यांचे हे वक्तव्य अद्यापही चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ते व्हायरल होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंनी का केलं थोरातांचं कौतुक?

शिर्डी लोकसभा मतदारसंघ भाजप नेते आणि महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. हा विखे यांचा बालेकिल्ला आहे तसेच त्यांचे कट्टर विरोधक काँग्रेस नेते थोरात यांचेदेखील कार्यक्षेत्र आहे. त्यादृष्टीने ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेनेसाठी साखर पेरणी केली.

एकीकडे उद्धव ठाकरे यांनी विखे यांचा खरपूस समाचार घेतला. त्याच वेळेस थोरात यांच्यावर स्तुतिसुमने उधळत त्यांच्या दिलदारपणाचे कौतुकही केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फळीतील परस्पर समन्वय निर्माण करण्याचा उद्धव ठाकरे यांचा हा प्रयत्न किती फलदायी ठरतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

edited by sachin fulpagare

R

Uddhav Thackeray, Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe Patil
Uddhav Thackeray News : घराणेशाहीचा आरोप करणारा तरी घरंदाज आहे का! उद्धव ठाकरेंची टीका...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com