Uddhav Thackeray : 'मीच तुझा भाऊ, सर्व फुकट खाऊ'; महायुती सरकारवर उद्धव 'ठाकरी' शैलीत बरसले

Uddhav Thackeray criticism of the mahayuti government at the convention of Maharashtra State Old Pension Association in Shirdi : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर शिर्डीतून ठाकरी शैलीत टीका.
Uddhav Thackeray 2
Uddhav Thackeray 2Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शिर्डीतील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या महाअधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

"लाडकी बहीण योजना आणल्यांमध्ये लाडका भाऊ कोण, हेच आता कळत नाही. भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणीला कळत नाही. कारण यांच्यात मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ, असं म्हणत सुटले आणि हे सर्व फुकट खाऊ आहेत", अशा 'ठाकरी' शब्दांमध्ये महायुती सरकारवर उद्धव ठाकरेंनी टीका केली.

शिर्डीतील जुनी पेन्शनसाठी महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंनी जुन्शी पेन्शनचा शब्द देताना, महायुती भाजप (BJP) सरकार इतर योजनांवर पैसा खर्च करत असताना, या मागणीवर तोडगा का काढत नाहीत? असा प्रश्न केला. उद्धव ठाकरेंनी यावेळी राजकारणाऱ्यांना मिळणारी आणि सर्वसामान्य नोकरदाराला मिळणाऱ्या पेन्शनवरून महायुती सरकारवर निशाणा साधला.

Uddhav Thackeray 2
Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाबाबत शिर्डीत उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य...

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "राजकारणाऱ्यांना किती पेन्शन मिळते आणि तुम्हाला किती? याची आकडेवारीची तफावत मोठी आहे. मंत्री, आमदार, नेते हे कंत्राटी कामगार आहेत. तु्म्ही पर्मनेंट कामगार आहात. कंत्राटी कामगारांना 50 खोके मिळत असतील, तर कायमच्या कामगारांना का मिळाले नाही पाहिजे? सरकार तुम्ही चालवता, आम्ही नाही". कोरोना काळात तुम्ही जीवावर उदार होऊ उतरलात, तर महाराष्ट्र वाचला नसता, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Uddhav Thackeray 2
Mahayuti News : हडपसर मतदारसंघावरून सस्पेन्स कायम; तुपेंना धाकधूक तर भानगिरे यांच्या आशा पल्लवीत

हे सर्व फुकट खाऊ आहेत

'योजना आम्ही जाहीर करतो, तुम्ही राबवता, तु्म्ही साथ दिली नाही, तर सरकार चालू शकत नाही. कोणतेच सरकार चालू शकत नाही. फोटो कोणाचे येतात, दाढीचे येतात. आता किती उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हेच कळत नाही. आता लाडकी बहीण योजना आणली आहे, त्यात लाडका भाऊ कोण हेच कळत नाही, भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणीला कळत नाही, कारण हे सर्व म्हणतात की, मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ. हे सर्व फुकट खाऊ आहेत. पण हा पैसा जनतेचा', असा खणखणीत टोला उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला लगावला.

यांना पेन्शन देऊ, पण घरी बसवू

'केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात, जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही. आणि आता लागू केली, तरी यांचे चेलेचपाटे, ही योजना लागू करू देणार नाहीत. दिल्लीने डोळे वटारले, तरी यांची इकडं... निवडणुकीच्या तोंडावर असल्याने हे आता काहीही करतील, हे सांगताना कोपरगावमधील पाच नंबरच्या तलावाचं अलीकडं भूमिपुजन होत आहे. मी मुख्यमंत्री असताना 131 कोटी रुपये मंजूर केल्याची आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली. कोपरगावच्या लोकांना पाणी दिलं पाहिजे. पण यांची थेअरं बघितलीना, आता यांना पेन्शन देऊ, पण घरी बसवू. 10 टक्क्यांच्या कपातीत पारदर्शकता हवी. तसंच निवृत्ती वेतनात दहा वर्षे, 25 वर्षांच्या अटी का लावता, ते देखील तपासलं पाहिजे', असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com