Maratha Reservation : उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर अजितदादांच्या आमदाराच्या मतदारसंघातून मराठा आंदोलनासाठी मदतीचा प्रचंड ओघ सुरू

Dindori Support for Maratha Protest : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न राज्य शासन आणि महापालिकेने केल्याच्या बातम्या चर्चेत होत्या.
Manoj Jarange Patil
Villagers from Dindori prepare and send food, water, and essential supplies daily to Mumbai in support of the Maratha reservation protest.Sarkarnama
Published on
Updated on

Dindori News, 31 Aug : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न राज्य शासन आणि महापालिकेने केल्याच्या बातम्या चर्चेत होत्या.

मुंबईतील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून झाल्याचा आरोप आहे. त्याच्या वेगळ्या प्रतिक्रिया राज्यभर उमटत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आंदोलनाला खुद्द अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवड यांच्या मतदारसंघातूनच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या आंदोलनापासून अंतर ठेवून आहे. अशातच दिंडोरी मतदार संघातून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : सोशल मीडियावर नको, मैदानात उतरून पाठिंबा द्या! मराठा क्रांती मोर्च्याच्या संयोजकांनी मंत्री, आमदारांना सुनावलं

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. त्यानंतर समाज माध्यमांवर याबाबतची चर्चा सुरू झाली. त्याला दिंडोरीच्या सक्रिय आणि जागरूक ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. आज येथून पाच वाहने अन्नपदार्थ आणि पाणी घेऊन मुंबईला रवाना झाले.

बाजार समितीचे सभापती आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मराठा महासंघाने यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यामुळे विविध गावातून घरोघरी भाकरी आणि कोरडी भाजी बनवून मुंबईला देण्याचा निर्णय झाला. यापुढे आंदोलन सुरू असेपर्यंत रोज एक टेम्पो भरून अन्नपदार्थ आणि पाणी मुंबईला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलकांना मदतीचे आवाहन आल्यावर सर्वप्रथम सदानंद शिवले यांनी एक हजार बॉक्स पिण्याचे पाणी दिले मडकी गावातून विविध घरांतून भाकरी, सुकी चटणी, भेळ भत्ता, बिस्किटे, केळी असे विविध पदार्थ संकलित करण्यात आले. विशेष म्हणजे म्हेळूस्के या गावातून भेळ भत्याचे 1000 पुडे, फरसाण संकलित करून मुंबईला पाठविण्यात आले.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : सरकार 'अ‍ॅक्शन'मध्ये! अजित पवार, एकनाथ शिंदे तातडीने मुंबईला रवाना

दिंडोरी तालुक्यातील मडकी जांब, वणी, म्हेळूस्के, मावडी, वरखेडा, हस्ते माळे, वणी खुर्द, राशेगाव, निळवंडी अशा विविध गावातून मोठ्या प्रमाणावर साहित्य जमा झाल्याने तो चर्चेचा विषय बनला. दिंडोरी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड.

उपसभापती योगेश बर्डे, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब घडवजे, भूषण घडवजे, नंदू घुमरे, नाना सोनवणे, रोहित बर्डे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी याबाबत नियोजन केले. खाद्यसामग्रीचे पाच वाहने घेऊन हे सर्व पदाधिकारी आज सकाळी मुंबईला रवाना झाले. ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाचे दातृत्व यातून चर्चेचा विषय ठरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com