Shiv Sena (UBT) demands for minister resignations: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने राज्यातील महायुती सरकार विरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी अशी मागणी करण्यात आली.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे महायुती सरकारमधील कलंकीत आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या अकलपट्टीसाठी सोमवारी नाशिक मध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या या आंदोलनात शहरातील सर्व नेते आणि पदाधिकारी हजर होते. जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
राज्यातील महायुती सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. या सरकारवर आता नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची आर्थिक स्थिती चुकीच्या धोरणामुळे बिघडली आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
भाजपचे राज्यमंत्री नितेश राणे, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ या चार मंत्र्यांसह आमदार गोपीचंद पडळकर आमदार किसन कथोरे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट तसेच राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. या आरोपांमध्ये काहींचे वादग्रस्त व्हिडिओ देखील प्रसारित झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) पक्षाच्या क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी अनमानकारक भाषेचा वापर केला. त्याच बरोबर त्यांनी राज्य सरकारला देखील घरचा आहेर देत भिकारी संबोधले होते.
महायुती सरकारच्या विविध मंत्र्यांवर सातत्याने आरोप होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) याबाबत डोळे बंद करून बसले आहेत. त्याचा थेट परिणाम राज्य शासनाच्या कारभारावर झाला आहे. एकीकडे प्रचंड मोठ्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे सामान्य यांच्या योजना आर्थिक अडचणींमुळे बंद अशी विरोधाभाजाची स्थिती आहे, असा आरोप शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी केला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झालेल्या या आंदोलनात उपनेते गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते नितीन आहेर पिंटू सोनवणे ग्रामीण संपर्क नेते जयंत दिंडे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.