Uddhav Thackeray : योगेश कदमांनंतर मोर्चा दादा भुसेंकडे; हिरेंना ताकद अन् ठाकरेंचे मालेगावात शक्तीप्रदर्शन

Shivsena News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ रविवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धडाडणार आहे.
Dada Bhuse, Uddhav Thackeray News
Dada Bhuse, Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ रविवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धडाडणार आहे. मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे, त्यामुळे मागील दोन दिवसात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच कामाला लागला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापासून आदित्य ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) आणि इतर नेत्यांच्या राज्यभरात अनेक सभा, दौरे, मेळावे होत आहेत. यात उद्धव ठाकरे हे देखील मैदानात उतरले असून त्यांनी रत्नागिरीतील खेड येथून पहिल्या जाहीर सभेची सुरुवात केली. त्यानंतर आता ते मालेगावात येऊन धडकणार आहेत. आमदार योगेश कमद यांच्या मतदार संघातून सभांची सुरुवात केली आहे. त्यानंतर आता मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदार संघात सभा होणार आहे.

Dada Bhuse, Uddhav Thackeray News
Rahul Gandhi : राहुल गांधींवरील कारवाईची अमेरिकेतही दखल; भारतीय वंशांचे खासदार, पंतप्रधान मोदींना म्हणाले...

उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये येत असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. मालेगाव येथील एमएसजे महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून दादा भुसे हे निवडून आले आहेत. शिवसेना फुटल्यानंतर ते बाहेर पडले आणि शिवसेना शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे हा गट एकाकी पडला होता. अशातच मालेगावमधून भाजपचे अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी हिरे यांची उपनेते पदी निवड केली आहे.

हिरे यांच्या माध्यमातून ठाकरे यांनी दादा भुसे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या सभेच्या माध्यमातून ठाकरे गट आणि हिरे हे शक्तीप्रदर्शन करणार आहे. यामुळे दादा भुसे यांचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे उद्या होणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मालेगाव तालुक्यासह परिसरात शिवसेना (Shivsena) ठाकरे गट संपर्क वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा असल्याचे सांगितले जात आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यातही मालेगाव मतदारसंघ आता शिवसेनेकडेच राहणार असे सुतोवाच देखील संजय राऊत यांनी आज सकाळी मालेगाव येथे बोलताना केले. त्यामुळे निश्चितच उद्या होणारी सभा ही महत्त्वाची आहे.

Dada Bhuse, Uddhav Thackeray News
Priyanka Gandhi : आमच्या शरीरात शहिदांचे रक्त; प्रियांका गांधी आक्रमक : हे मोठं षडयंत्र...

दरम्यान, राज ठाकरे यांची नुकतीच शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या दिवशी सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवरजोरदार निशाणा साधला. त्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात रोजच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर नुकताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरासह राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या सभेत काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com