Dhananjay Munde : धनंजय मुंडेंमुळे पालकमंत्रिपदाचे वाटप रखडले का? शिंदे गटातील नेत्याने दिली 'ही' माहिती

Guardian Minister post Allotment : पालकमंत्री वाटपापर्यंतच्या निर्णयापर्यंत महायुती आलेली आहे. एक-दोन अपवाद आहेत. ते झाले की, पुढील महिन्याच्या सुरुवातीला पालकमंत्रिपदाचा विषय मार्गी लागेल.
Bharat Gogawle-Dhananjay Munde
Bharat Gogawle-Dhananjay Munde Sarkarnama
Published on
Updated on

Raigad, 12 January : संतोष देशमुख खूनप्रकरणी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत आहेत, त्यामुळे पालकमंत्रिपदाचं वाटप थांबलेलं आहे, असे मला तरी वाटत नाही. एखाद्या जिल्ह्याचा अपवाद सोडला तर बाकी कुठे काही अडचण नाही. मात्र, पालकमंत्रिपदाच्या वाटपात मुंडेंचं कारण होऊ शकत नाही, असा दावा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केला.

रायगडावर माध्यमाशी बोलताना भरत गोगावले यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यात बीडच्या प्रकरणावरूनही त्यांना विचारण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यामुळे पालकमंत्रिपदाचा वाटप थांबलेलं नाही, असे स्पष्ट केले.

मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawle) म्हणाले, चांगल्या गोष्टी होत असताना काहींसा उशीर होत असतो. पालकमंत्रिपदाच्या वाटपापर्यंतच्या निर्णयापर्यंत महायुती आलेली आहे. एक-दोन अपवाद आहेत. ते झाले की, पुढील महिन्याच्या सुरुवातीला पालकमंत्रिपदाचा विषय मार्गी लागेल, असे आम्हाला वाटते.

संतोष देशमुख खून प्रकरणी सीआयडी, न्यायाधीश आणि एसआयटी या तीन माध्यमांतून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची मला संपूर्ण माहिती नसल्यामुळे त्यावर बोलणे उचित ठरणार नाही.

Bharat Gogawle-Dhananjay Munde
Devendra Fadnavis : शिर्डीच्या अधिवेशनात फडणवीसांनी लोकसभेची ‘ती’ खंत बोलून दाखवलीच; म्हणाले, ‘मनातून नापास झालो होतो’

संतोष देशमुख यांचा ज्या निर्घृणपणे खून झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना जो न्याय पाहिजे आहे, तो मिळाला पाहिजे, या मताशी संपूर्ण महाराष्ट्र सहमत आहे. त्याच धर्तीवर तपास सुरू असून सात जणांना मोका लावण्यात आलेला आहे. या प्रकरणांतील प्याद्यांचा शोध सुरू आहे. संतोष देशमुख कुटुंबीयांना निश्चितपणे न्याय दिला जाईल, असा विश्वासही गोगावले यांनी बोलून दाखवला.

गोगावले म्हणाले, उद्वव ठाकरे यांची शिवसेना महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार आहे, त्यावर भरत गोगावले म्हणाले की, प्रत्येकाची इच्छा असते. ज्याच्या जे मनात येईल, ते तो करेल. आम्ही मात्र महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढायचं ठरवलेलं आहे.

Bharat Gogawle-Dhananjay Munde
Shirdi BJP Convention : फडणवीसांचा ‘मविआ’वर गंभीर आरोप; ‘निवडणुकांमध्ये अराजकतावादी शक्तींचा वापर’

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करायचा आहे. त्याबाबत सरकार विचाराधीन आहे. पहिले जे १५०० रुपये सुरू आहेत, ते बंद होणार नाहीत, याची दक्षता आम्ही घेत आहोत. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देत असताना ते योग्य लोकांनाच मिळाले पाहिजेत, याचीही काळजी आम्ही घेत आहोत. निवडणुकीच्या वेळी थोडी घाईगडबड झाली, नको त्याला पैसे मिळाले होते. ते होऊ नयेत, याची काळजी सरकार घेत आहे, असेही भरत गोगावले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com