Uddhav Thackeray Rally : खानदेशात धडाडणार 'ठाकरी तोफ' ; कुणाकुणाचा घेणार समाचार ?

Uddhav Thackeray Rally In Jalgaon : एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंड केलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांचा कसा समाचार घेणार?
Uddhav Thackeray Rally In Jalgaon
Uddhav Thackeray Rally In JalgaonSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : राज्यातील राजकीय वातावरण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ढवळून निघाले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच राजकीय पक्षाकडून आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ खानदेशात धडाडणार आहे. १० सप्टेंबरला जळगावात ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या खानदेशच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray Rally In Jalgaon
BJP Former MP-MLA Will Join NCP: एकनाथ खडसे देणार भाजपला दणका; माजी खासदार, माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १० सप्टेंबरला जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे आता ठाकरे गट जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा ताकदीने उतरणार, हे स्पष्ट झाले आहे. जळगावात शिवसेना ठाकरे गटात जुने व नवीन असा वाद आहे. हा वाद सोडविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंड केलेले मंत्री गुलाबराव पाटील यांचा ठाकरे कसा समाचार घेणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Uddhav Thackeray Rally In Jalgaon
One Nation One Election : 'वन नेशन-वन इलेक्शन' आलं टप्प्यात ? अमित शाह घेणार माजी राष्ट्रपतींची भेट !

दरम्यान, तत्पूर्वी गेल्या काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने, या भागातील पिके करपू लागली आहेत. त्यामुळे ८ सप्टेंबरला नगर जिल्ह्यातील दुष्काळाच्या परिस्थितीची पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत. यावेळी संगमनेर व पुणतांबा येथील शेतकऱ्यांची भेट घेत, ठाकरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काय घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com