One Nation One Election : 'वन नेशन-वन इलेक्शन' आलं टप्प्यात ? अमित शाह घेणार माजी राष्ट्रपतींची भेट !

Amit Shah Meet Ramnath Kovind On One Nation One Election : डिसेंबरपर्यंत देशात आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा एकाच वेळी कार्यक्रम जाहीर होईल का?
One Nation One Election
One Nation One ElectionSarkarnama

Delhi News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दुपारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. नुकतीच केंद्र सरकारने रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 'एक राष्ट्र, एक निवडणूक'बाबत समिती स्थापना केली आहे. देशात लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबत 'एक राष्ट्र, एक निवडणूक' या धोरणाबाबत ही समिती चाचपणी करणार आहे. आता देशाचे गृहमंत्री शाह हे कोविंद यांच्या भेटीला जाणार असल्याने या समितीच्या कामकाजाला गती येण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

One Nation One Election
One Nation One Election : 'एक देश, एक निवडणुकी'वर राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, इंडिया म्हणजे..

एक देश - एक निवडणुकीसाठी मोदी सरकारकडून समिती स्थापन करण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. केंद्र सरकारने 'वन नेशन वन इलेक्शन'चा निर्णय लागू करता येईल का? या संदर्भात शक्यतांची चाचपणी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. (Latest Political Marathi News)

One Nation One Election
Rohit Pawar News : उन्हामुळे पवारांच्या सभेत गोंधळ; रोहित पवार थेट लोकांमध्ये

मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात 'एक देश - एक निवडणुकीचा' विधेयक येणार असल्याचे बोलले जात आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे आता मुदतपूर्व निवडणुका होतील का? लोकसभेचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच निवडणुका पार पडणार का? अशा चर्चांना एकच उधाण आले आहे. डिसेंबरपर्यंत देशात आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा एकाच वेळी कार्यक्रम जाहीर होईल का? अशी शक्यताही बोलून दाखवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com