Mahavikas Aghadi News : ...म्हणून नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीला धक्का बसणार?

Nandurbar Politics News : जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण आणि लोकसभा निवडणुकीअगोदर महाविकास आघाडीला आहे धोक्याचे संकेत!
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Udesingh Padvi News : नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता दिसत आहे. कारण, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी हे बुधवारी महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक सूचक विधान केलं.

उदेसिंग पाडवी हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय असून एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याने उदेसिंग पाडवी देखील भाजपा जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पाडवी म्हणाले, 'एकनाथ खडसे हे पंधरा दिवसानंतर भाजपात जातील.

परंतु त्याआधी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. एकनाथ खडसे आम्हाला ज्यावेळेस बोलवतील आणि आमच्यासमोर त्यांची भूमिका मांडतील त्यावेळेस आम्ही विचार करू, असं विधान माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahavikas Aghadi
Eknath Khadse News : एकनाथ खडसे म्हणाले; 'मी घर बांधलंय, भाजपमध्ये माझ्या घरी जातोय'

त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत(Mahavikas Aghadi) पुन्हा फूट पडणार का अशी देखील चर्चा रंगली आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे भाजपात जात असल्याने याच्या परिणाम महाविकास आघाडीवर होणार असून, नंदुरबार जिल्हा देखील खडसे यांना मानणारा मोठा गट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांना मानणारा वर्ग देखील भाजपात घरवासी करणार अशी शक्यता आहे, यामुळे महायुतीचा मोठं बळ मिळणार आहे.

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे लवकरच स्वगृही परतणार आहेत, म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मी भाजपमध्ये प्रवेश करतोय. मी हे घर बांधले आहे, मी माझ्या घरात लवकरच परत जातोय, अशा शब्दांत आमदार एकनाथ खडसे (Ekanath Khadse) यांनी भाजपमधील (Bjp) घरवापसीबाबत ‘सरकारनामा’शी बोलताना शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता खडसेंसोबत त्यांचे समर्थक नेतेही भाजपात जाणार का, हे पाहावे लागणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Mahavikas Aghadi
Unmesh Patil News: गिरीशभाऊ, तोंड सांभाळून बोला, जामनेरमधून बाहेर पडू देणार नाही; भाजपला सोडचिठ्ठी दिलेले खासदार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com