Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अन् उक्कलगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार; कारण काय ?

Ahmednagar Politics: विकासकामे न झाल्याच्या निषेधार्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Gram Panchayat Election
Gram Panchayat Election Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, वाकण वस्तीवरील ग्रामस्थांनी परिसरात विकासकामे न झाल्याच्या निषेधार्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसह आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवरही उक्कलगाव (ता. श्रीरामपूर ) येथील वाकण वस्तीवरील समस्त गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही विकासकाम न झाल्याने गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील निवेदन श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सांवत यांना देण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gram Panchayat Election
Ahmednagar BJP: भाजपची नगर शहर कार्यकारिणी जाहीर; विखे गटाला झुकते माप

या निवेदनात म्हटलेय की, वाकण वस्ती रोडचे रस्त्याचे २० वर्षांपूर्वी खडीकरणाचे काम झाले. पण त्यानंतर अनेक वर्षे उलटले तरी अद्यापही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून रस्त्याचा विकास झाला नाही. रस्त्याचे काम न झाल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

या रस्त्यावरून शाळकरी मुलांबरोबर शेतकऱ्यांना ये-जा करावी लागते. पावसाळ्यात तर चालणेही अवघड होऊन जाते. या रस्त्यावर अनेक वेळा अपघात घडलेले आहेत. परंतु रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वैद्यकीय सेवाही वेळेवर मिळत नाही. ग्रामपंचायत, आमदार, खासदारांना निवेदन देऊनदेखील कोणतीही कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत.

विकासकामांपासून वंचित राहिल्यामुळे वाकणवस्ती ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतच्या देण्यात आलेल्या निवेदनात सर्वच ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत. तसेच कोणतीही विकासाची गंगा वाकणवस्ती येथे आणली याचे फक्त एक उदाहरण द्या, असा सवालच ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

याबरोबरच वाकण वस्ती येथील दीपक किसन थोरात यांच्या वस्तीपर्यंत तसेच गोरख बाबूराव थोरात यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या पाणीपुरवठ्याची पाइपलाइन झाली. मात्र, एकदाही पाणी मिळाले नाही. आम्हीही गावकरी आहे बरं का ?, असा प्रश्न ग्रामस्थांनी या वेळी उपस्थित केला.

Edited by : Ganesh Thombare

Gram Panchayat Election
Ahmednagar MNS: राज ठाकरेंनी सुमित वर्मांवर सोपवली मोठी जबाबदारी; थेट विद्यार्थी सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com