Ulhas Patil : कमळ हाती घेतलेल्या उल्हास पाटलांना काँग्रेसचा दणका; थेट सहा वर्षांसाठी निलंबित

Jalgaon Congress : नाना पटोलेंच्या निर्देशानुसार कोणतेही कारण न देता केली हकालपट्टी
Ulhas Patil, Varsha Patil
Ulhas Patil, Varsha PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political News : काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील, तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षाचे संघटन व प्रशासन उपाध्यक्ष नाना गांवडे यांनी याबाबतचे पत्र सोमवारी जारी केले आहे.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ulhas Patil) गेल्या ३० वर्षांपासून काँगेसमध्ये आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. जळगाव जिल्ह्यात व खानदेशात काँग्रेस पक्षाचे ते आधारस्तंभ होते. त्यांनी नुकतीच काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली होती, तर त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे. मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले नाही.

Ulhas Patil, Varsha Patil
Ayodhya Ram Temple : पक्ष धोरण धुडकावत काँग्रेसच्या बड्या नेत्याने गाठली अयोध्या

दरम्यान, डॉ. उल्हास पाटील यांनी आपली कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या या बॉम्बने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Ulhas Patil, Varsha Patil
Ayodhya Mosque : मोठी बातमी! राम मंदिरानंतर अयोध्येत आता मशिदीचाही मुहूर्त

पाटलांच्या या निर्णयाचा काँग्रेस पक्षाला यामुळे जोरदार धक्का बसला आहे. मुंबईतील नेते मिलिंद देवरा यांच्यानंतर आता अनेक वर्षांपासूनचे खंदे समर्थक डॉ. उल्हास पाटलांच्या सोडून जाण्याने काँग्रेसला जळगाव जिल्ह्यासह खानदेशात हादरा बसला आहे. त्यांच्या निर्णयानंतर काँग्रेसच्या वरिष्ठस्तरावर सोमवारी बैठक पार पडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाने काढलेल्या पत्रात कोणतेही कारण न देता प्रांताध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या निर्देशानुसार कारवाई केल्याचे कळवण्यात आले. पक्षाचे संघटन व प्रशासन विभागाचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीनिशी हे पत्र पाटलांना दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Ulhas Patil, Varsha Patil
Uddhav Thackeray : बाबरीचा ढाचा पाडताना कोणी शेपूट घातलं होतं? ठाकरे गटाने भाजपाला पुन्हा डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com