Bazar Samiti Election : जामनेरमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजनांचा बोलबाला : सात जागांवर विजय; ११ ठिकाणी आघाडी

सोसायटी मतदार संघातील सातही जागा भाजपच्या निवडून आल्या आहेत. तर इतर मतदार संघातही सर्व उमेदवार भारतीय जनता पक्षाचेच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
Jamner Bazar Samiti Result
Jamner Bazar Samiti ResultSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जामनेर बाजार समिती (Bazar Samiti) संचालक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (BJP) ‘संकटमोचक’ तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. महाजन यांनी विरोधकांना क्लीन स्वीप देत सर्व १८ जागांवर आघाडी मिळविली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला या ठिकाणी आपले खाते उघडण्याची संधीही त्यांनी दिली नाही. (Undisputed supremacy of BJP Minister Girish Mahajan on Jamner Bazar samiti result)

जामनेर बाजार समितीत मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. या निवडणुकीत हमाल मापारी मतदार संघातून एक जागा अगोदरच भाजपने बिनविरोध जिंकली होती. उर्वरीत सतरा जागांवर मतदान झाले होते.

Jamner Bazar Samiti Result
Haveli Bazar Samiti Result : हवेलीत राष्ट्रवादी-भाजपत काँटे टक्कर : दोघांना दोन जागा; अजितदादांच्या कट्टर समर्थकाचा धक्कादायक पराभव

आजच्या मतमोजणीत सोसायटी मतदार संघातील सातही जागा भाजपच्या निवडून आल्या आहेत. तर इतर मतदार संघातही सर्व उमेदवार भारतीय जनता पक्षाचेच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व अठरा जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी होत आहेत. त्यामुळे मंत्री महाजन यांनी पुन्हा एकदा बाजार समितीवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे.

Jamner Bazar Samiti Result
Bazar Samiti Result : प्रशांत परिचारकांचा अभिजित पाटलांना धक्का : पंढरपूर बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय

जामनेर तालुक्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना (ठाकरे गट)यांना हा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीतील पक्षांना महाजन यांनी जोरदार धक्का दिला आहे. आगामी जिल्हा परिष, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जळगावात महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com