Haveli Bazar Samiti Result : हवेलीत राष्ट्रवादी-भाजपत काँटे टक्कर : दोघांना दोन जागा; अजितदादांच्या कट्टर समर्थकाचा धक्कादायक पराभव

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Haveli Bazar Samiti Result
Haveli Bazar Samiti ResultSarkarnama
Published on
Updated on

पुणे : निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून राज्याचे लक्ष लागलेल्या हवेली (Haveli) कृषी उत्पन्न बाजार समिती (Bazar Samit) निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झाला आहे. बाजार समितीच्या ग्रामपंचायत गटातून राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे रामकृष्ण सातव (सर्वसाधारण गट) व आबासाहेब आबनावे (अनुसूचित जाती जमाती गट) तर भाजप (BJP) पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार आघाडीचे रवींद्र कंद (आर्थिक दुर्बल घटक) आणि सुदर्शन चौधरी (सर्वसाधारण गट) विजयी झाले आहेत. (BJP and NCP win two seats each in Haveli Bazar Samiti)

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Haveli Bazar Samiti Result
Bazar Samiti Result : प्रशांत परिचारकांचा अभिजित पाटलांना धक्का : पंढरपूर बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय

राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर पॅनेलचे रामकृष्ण सातव यांना ४०५ मते मिळाली आहेत, आबासाहेब आबनावे हे ३०७ मते घेऊन विजयी झाले आहेत, तर भाजपचे सुदर्शन चौधरी यांना २५८ मते मिळाली आहेत. याशिवाय रवींद्र कंद हे ३७५ मते घेत विजयश्री खेचून आणली आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. पराभूत उमेदवार राहुल काळभोर यांना २३६, तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांना २११ मते मिळाली आहेत.

Haveli Bazar Samiti Result
Bazar Samiti Result : मंचरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठी आघाडी : बंडखोर देवदत्त निकम पिछाडीवर

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत हमाल मापाडी मतदार संघाचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. संतोष नांगरे यांनी ८८८ मते मिळवून आपल्या विजयाची शिट्टी वाजवली आहे. त्यांनी या मतदार संघातून राजेंद्र चोरघे ४०३, गोरख मेंगडे ३१४, संजय उंद्रे ८, गोपाळ दसवडकर ३ यांना मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत केले आहे.

हमाल मापाडी या मतदार संघात एका जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी एकूण २ हजार ७ पैकी १ हजार ८०२ इतके मतदान झाले. त्यापैकी १ हजार ६१६ मते वैध ठरली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com