Ahmednagar Politics: राजनाथ सिंह, मुख्यमंत्री शिंदेंचा नगर दौरा; पद्मश्री विखे साहित्य पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार

Padmashri Dr Vitthalrao Vikhe Patil : पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या 123 व्‍या जयंतीनिमित्‍त राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍कार सोहळा 31 ऑगस्टला पार पडणार आहे.
Rajnath Singh and Eknath Shinde
Rajnath Singh and Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या 123 व्‍या जयंतीनिमित्‍त देण्‍यात येणाऱ्या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्‍या हस्‍ते तसेच मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 31 ऑगस्टला प्रवरानगर (लोणी) येथे हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती खासदार सुजय विखे-पाटील यांनी दिली.

नियोजित 97 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष रविंद्र शोभणे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न होणाऱ्या या समारंभास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विशेष अतिथी म्‍हणून उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील यांच्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधून दरवर्षी साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचे वितरण करण्‍यात येते.

Rajnath Singh and Eknath Shinde
Congress's election preparations : काँग्रेसचे सोशल मीडिया वॉरियर्स सज्ज, दुही माजवणाऱ्या नीतीचा पराभव होणार !

प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात गुरुवारी 31 ऑगस्‍टला दुपारी 1.वाजता या साहित्‍य पुरस्‍कार वितरण सोहळ्यात यंदाच्‍या वर्षी सोलापूर जिल्‍ह्यातील डॉ.निशिकांत ठकार यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्‍यस्‍तरीय साहित्‍य सेवा जीवन गौरव पुरस्‍कार देवून सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

डॉ.शैलजा बापट यांना या वर्षीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्‍यस्‍तरीय उत्‍कृष्‍ठ साहित्‍य पुरस्‍काराने गौरविण्‍यात येणार असून विशेष साहित्‍य पुरस्‍कार विश्वास वसेकर यांच्‍या कविता संग्रहास देण्‍यात येणार असल्‍याचे डॉ.विखे पाटील यांनी सांगितले.

Rajnath Singh and Eknath Shinde
Nana Patole News : मुंबईतील 'इंडिया'च्या बैठकीतून 'मोदी सरकार चले जाव' चा नारा दिला जाणार

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यंदा प्रथमच या साहित्‍य पुरस्‍कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिन हा शेतकरी दिन म्‍हणूनही राज्‍यात साजरा केला जात असल्‍याने यंदाच्‍या या पुरस्‍कार वितरण सोहळ्यास मुख्‍यमंत्र्यांची असलेली उपस्थिती महत्‍वपूर्ण ठरणार असल्याचे डॉ. विखे-पाटील म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com