Nana Patole News : मुंबईतील 'इंडिया'च्या बैठकीतून 'मोदी सरकार चले जाव' चा नारा दिला जाणार

Congress News : देशातील विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला होणार आहे.
Nana Patole, Narendra Modi News
Nana Patole, Narendra Modi NewsSarkarnama

Mumbai News : देशातील विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला होणार आहे. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच 'चलो जाव' चा नारा दिला होता, तसाच मोदी सरकारलाही मुंबईतील 'इंडिया'च्या बैठकीतून 'चले जाव'चा नारा दिला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (ता.२८) मुंबईत सांगितले.

'एनडीए'तील काही पक्ष हे इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकतात, असा दावा पटोलेंनी यावेळी केला. इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार आहेत, तर, भाजपकडे नाही, असे सांगत नरेंद्र मोदींना जनता कंटाळली आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर आघाडी निर्णय घेईल, पण काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) हे पंतप्रधान व्हावेत भावना त्यांनी बोलून दाखवली.

Nana Patole, Narendra Modi News
BJP Vs Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना भाजप त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन ललकारणार ; 'परिवर्तना'ची दहिहंडी उभारणार

'शासन आपल्या दारी' उपक्रमातून जनतेच्या पैशाची लुट चालली असल्याचा आरोप त्यांनी केला. जेथे हा कार्यक्रम होतो, तेथील जनता सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करते, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर काही सहकारी राज्यातील युतीच्या सत्तेत विकासासाठी सहभागी झाले नसून 'ईडी'च्या धाकाने ते सामील झाले आहेत, असे पटोले यावेळी म्हणाले. कारण हेच लोक मागील अनेक वर्षांपासून सत्तेत होते, मग आतापर्यंत त्यांनी विकास का केला नाही, अशी विचारणा त्यांनी केली.

Nana Patole, Narendra Modi News
Ramdas Athawale News : लोकसभेसाठी आठवलेही आग्रही ; महायुतीत पेच ? दोन जागा लढवण्यावर ठाम

मुंबई-गोवा महामार्गाचे काम जवळपास १७ वर्षांपासून सुरु असूनही ते पूर्ण झालेले नाही. कारण त्याला भ्रष्टाचाराची कीड लागली असून भाजपची (BJP) मंडळी या रस्त्याच्या कंत्राटात भागीदार आहेत, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. तसेच कमीशनच्या वादातून हा रस्ता पूर्ण होत नाही. म्हणून अनेक कंत्राटदार काम सोडून पळून गेले. त्याचा फटका, मात्र कोकणच्या लोकांना बसत आहे, असे ते म्हणाले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com